पर्यूषण महापर्वात कत्तलखाने, मांस विक्री बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:12 AM2021-09-09T04:12:22+5:302021-09-09T04:12:22+5:30
नागपूर : जैन धर्मिय बांधवांचे पर्यूषण पर्व आता सुरू झाले आहे. या काळात शहरातील कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने ...
नागपूर : जैन धर्मिय बांधवांचे पर्यूषण पर्व आता सुरू झाले आहे. या काळात शहरातील कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवा, अशी मागणी करणारे पत्र दिगंबर जैन महासमितीने पोलीस आयुक्तांना दिले आहे.
दिगंबर जैन धर्मियांचे पर्यूषण महापर्व १० ते १९ सप्टेबर या काळात सुरू आहे. जैन धर्मियांमध्ये या पर्वाला अनन्यसाधारण महत्व आहे. अहिंसेचे पालन करण्याचे आवाहन या काळात सातत्याने केले जाते. दिगंबर जैन महासमितीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष सुनिल पेंढारी यांनी अलिकडेच पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात महाराष्ट्र शासनाच्या ७ सप्टेबर २००४ च्या परिपत्रकाचा संदर्भ दिला आहे. या नुसार राज्यशासनाने पर्यूषण काळात कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा आधार घेऊन शहरातील सर्व कत्तलखाने, मांस विक्री बंद राहतील याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी विनंती पेंढारी यांनी या पत्रातून केली आहे.