झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक
By योगेश पांडे | Updated: November 1, 2023 16:47 IST2023-11-01T16:46:25+5:302023-11-01T16:47:53+5:30
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक
नागपूर : झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अमित गजानन पाठे (२८, बोरडी, अचलपूर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित मुलगी ही तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते व ती यशोधरानगर परिसरात तिच्या आईसोबत कार्यक्रमाला गेली होती. मंगळवारी मध्यरात्र झाल्यामुळे ती आईसह कार्यक्रमस्थळीच झोपली. तेथे अमित होता व तो झोपलेल्या मुलीच्या बाजुला गेला व तिच्यासोबत गैरवर्तन केले. मुलीला जाग आली व तिने लगेच आईला हा प्रकार सांगितला. तिच्या आईने इतर लोकांना मुलीची आपबिती सांगितली व तिला घेऊन यशोधरानगर पोलीस ठाण्यात गेली. मुलीच्या तक्रारीवरून अमितविरोधात पोक्सो ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.