विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:33+5:302021-03-04T04:14:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता मृत्यूच्या संख्येतही वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण ...

Slight decrease in the number of corona victims in Vidarbha | विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट

विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता मृत्यूच्या संख्येतही वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बुधवारी कोरोनाबाधित व मृत्यूच्या आकड्यात घट दिसून आली. बुधवारी विदर्भात ३,१३८ नवे रुग्ण व २१ मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. तेथे १ हजार १५२ रुग्ण आढळून आले व सहा जणांचा मृत्यू झाला, तर सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले. तेथे सात मृत्यूंची नोंद झाली व ६७१ नवे रुग्ण आढळून आले.

जिल्हा- रुग्ण- मृत्यू

नागपूर -११५२ - ६

भंडारा- २५ - ००

वर्धा- १७४ - ०३

गोंदिया -२४ - ००

गडचिरोली -१८- ००

चंद्रपूर -४३ - ००

अमरावती -६७१ - ७

अकोला - ४३१ - ०२

यवतमाळ -१५५ - ०२

बुलडाणा -३२१ - ०१

वाशिम - १२४ - ००

एकूण - ३१३८ - २१

Web Title: Slight decrease in the number of corona victims in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.