बाजूला स्मार्ट सिटी, पारडीची वाईट स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:09 AM2021-02-09T04:09:09+5:302021-02-09T04:09:09+5:30

नागपूर : नागपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरात मेट्रो रेल्वे धावत आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी लगतच्या पारडी भागात ...

Smart City aside, Pardi's poor condition | बाजूला स्मार्ट सिटी, पारडीची वाईट स्थिती

बाजूला स्मार्ट सिटी, पारडीची वाईट स्थिती

Next

नागपूर : नागपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरात मेट्रो रेल्वे धावत आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी लगतच्या पारडी भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. रस्ते, गडर लाईन, पिण्याचे पाणी, शाळा, रुग्णालये अशा मूलभूत सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. महापालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनाकडे वर्षानुवर्षे तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याची व्यथा या भागातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडली. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसेल तर नागपूर स्मार्ट सिटी कशी होईल.

भारतनगरात गडरलाईनची समस्या

पारडी परिसरातील भारतनगरात गडरलाईनची समस्या आहे. या भागात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरात खुले मैदान आहे. परंतु या मैदानात खेळणी नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. मैदानात पाणी साचत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला दिसतो. या भागात अनेक रिकामे प्लॉट आहेत. या प्लॉटमध्ये पाणी साचते. नगरसेवकांना तक्रार करूनही काहीच फायदा झाला नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. महानगरपालिकेने नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

पांगुळ वस्तीत पाण्याची समस्या

पांगुळ वस्तीत नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना टँकरच्या भरवशावर राहावे लागते. परिसरातील बोअरवेल बंद आहेत. अनेकदा तक्रार करूनही बोअरवेल दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. या भागात गडरलाईन चोक झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गडरलाईनचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या भागातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्ते खराब झाल्यामुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे या भागात कचरा साचलेला दिसतो. परिसरात खुले मैदान आणि मात्र मैदानात मुलांना खेळणी नसल्यामुळे मुलांची गैरसोय होत आहे.

राहुल गांधीनगरात रस्त्याची दुरवस्था

राहुल गांधीनगरात रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. या भागात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे नेहमीच अपघात होतात. परिसरात गार्डन नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. या भागात नळलाईन नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. येथे सार्वजनिक शौचालय आहे. परंतु या शौचालयाची नियमित सफाई होत नसल्यामुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे.

रस्त्याची समस्या दूर करावी

परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नळलाईन नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महानगरपालिकेने या भागात नळलाईनची व्यवस्था करण्याची गरज आहे.’

- रूपलाल शाहू, नागरिक

गडरलाईनची व्यवस्था महत्त्वाची

‘गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गडरलाईन नसल्यामुळे घाण पाणी परिसरात साचून राहते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात गार्डन नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होते. महानगरपालिकेने या भागातील समस्या सोडविण्याची गरज आहे.’

- भारत वनारसे, नागरिक

नियमित सफाई महत्त्वाची

‘भारतनगर परिसरात सफाई कर्मचारी नियमित येत नाहीत. त्यामुळे जागोजागी कचरा साचलेला दिसतो. परिसरात गार्डनसाठी खुले मैदान आहे. परंतु तेथे खेळणी नाहीत. या मैदानात पाणी साचत असल्यामुळे पावसाळ्यात डासाचा प्रादुर्भाव होतो. परिसरातील रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे.’

- हरिभाऊ बानाईत, नागरिक

रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी

‘परिसरात अनेक रिकामे प्लॉट आहेत. या प्लॉटमध्ये पाणी साचत असल्यामुळे डासाचा प्रादुर्भाव होतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने या रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.’

- गणेश भोजने, नागरिक

.............

या आहेत समस्या

-गडरलाईनची समस्या गंभीर

-रस्त्याची अवस्था बिकट

-अंतर्गत रस्ते नादुरुस्त

-नळाची पाईपलाईन नाही

-पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

-रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी

...............

Web Title: Smart City aside, Pardi's poor condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.