स्मार्ट सिटी; नागपूर २३ व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:43 PM2020-09-26T23:43:18+5:302020-09-26T23:44:52+5:30
नागपूर शहराने स्मार्ट सिटी रॅकिंगमध्ये सुधारणा करीत ४८ वरून २३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यात पुणे आणि नाशिक वगळता इतर सर्व शहरे नागपूरच्या मागे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराने स्मार्ट सिटी रॅकिंगमध्ये सुधारणा करीत ४८ वरून २३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यात पुणे आणि नाशिक वगळता इतर सर्व शहरे नागपूरच्या मागे आहेत.
स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार यांनी नुकतीच स्मार्ट सिटीज मिशन ऑफ इंडिया अंतर्गत निवडलेल्या महाराष्ट्रातील ८ शहरांचा आढावा घेतला. मागील दोन महिन्यात नागपूर शहराने केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या १९६ कोटींच्या अनुदाचा १०० टक्के वापर केला.
राज्यात पुणे आणि नाशिक वगळता अन्य शहरे नागपूरच्या मागे असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोनी........ यांनी दिली. महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात रॅकिंगमध्ये सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटिझन मिशन अंतर्गत गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज आणि स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत नागपुरात सुरू असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.