नाग नदीला येणार स्मार्ट लुक

By admin | Published: March 15, 2016 04:48 AM2016-03-15T04:48:55+5:302016-03-15T04:48:55+5:30

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु नाग नदीच्या प्रदूषणामुळे यात बाधा निर्माण झाली आहे;

Smart look to Nag river | नाग नदीला येणार स्मार्ट लुक

नाग नदीला येणार स्मार्ट लुक

Next

नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु नाग नदीच्या प्रदूषणामुळे यात बाधा निर्माण झाली आहे; सोबतच गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी प्रदूषित होत आहे. ही बाब विचारात घेता १४७६.९६ कोटींचा नाग नदी प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
नागपूर शहरातील सर्व नद्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्पाकरिता १२६ कोटींचा प्रकल्प अहवाल यापूर्वी राज्य शसानाने शिफारशीसह केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडे सादर केला होता. केंद्र शासनाने हा प्रस्ताव आयआयटी रुरकी यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला होता. त्यावर चर्चा करून महापालिकेने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुरकी यांच्या निर्देशाप्रमाणे नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाऐवजी नाग नदी प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
या अहवालात उत्तर व मध्य सिवरेज झोनमध्ये निर्मित संपूर्ण सिवरेजचे संकलन व नि:सारण व्यवस्थापन करणे, नाग नदीतील सांडपाण्याच्या स्रोतांचा शोध घेऊ न सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्रक्रिया केलेले सांडपाणी परत नदीत सोडून नदी मलमुक्त करण्याचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

आठ वर्षांनंतर प्रकल्प अहवाल
नाग नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतील नागपूर विकास आघाडीने अनेक योजना तयार केल्या, तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परंतु प्रदूषणाला आळा बसलेला नाही. आता आठ वर्षांनंतर नाग नदी प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.
३३९ कोटींचा घनकचरा प्रकल्प
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी शहरातील एकीकृत घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राज्य शासनाकडे सादर करावयाचा आहे. त्यानुसार ३३९ क ोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
नदीकाठच्या भागाचा विकास
नागनदीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प अहवाल सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारमार्फत केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यास नागनदीचे अस्तित्व कायम राहील. सोबतच शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या प्रकल्पात नागनदीचा काठचा भाग विकसित केला जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल.

Web Title: Smart look to Nag river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.