इंदूर पुरी एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर, प्रवाशांमध्ये घबराट; गाडी दीड तास लेट
By नरेश डोंगरे | Published: January 20, 2023 03:07 AM2023-01-20T03:07:22+5:302023-01-20T03:08:37+5:30
इंदूर पुरी एक्सप्रेस येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर आज रात्री नेहमीप्रमाणे आली. रात्री ८.१० च्या सुमारास ती निघण्याच्या तयारीत असताना एसी थर्ड कोच - बी ८ च्या चाकातून घर्षणाच्या वेळी निघणाऱ्या आगीच्या सुक्ष्म ठिणग्या आणि धूर निघताना दिसला.
नागपूर : येथील रेल्वेस्थानकावरून सुटण्याच्या तयारीत असलेल्या इंदूर पुरी एक्सप्रेसच्या एसी कोचच्या चाकांमधून धूर निघत असल्याने प्रवाशांत काही वेळ मोठी घबराट निर्माण झाली होती.
इंदूर पुरी एक्सप्रेस येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर आज रात्री नेहमीप्रमाणे आली. रात्री ८.१० च्या सुमारास ती निघण्याच्या तयारीत असताना एसी थर्ड कोच - बी ८ च्या चाकातून घर्षणाच्या वेळी निघणाऱ्या आगीच्या सुक्ष्म ठिणग्या आणि धूर निघताना दिसला. यामुळे तातडीने ही रेल्वेगाडी थांबवून दुरूस्ती करणारे पथक बोलविण्यात आले. त्यांनी चाकाची पाहणी केली. यानंतर संबंधित कोचमधील प्रवासी दुसऱ्या कोचमध्ये शिफ्ट करण्यात आले. या एकूणच प्रक्रियेत तब्बल दीड तासांचा अवधी लागला. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच कुचंबना झाली.