धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका : तज्ज्ञाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 09:30 PM2020-04-01T21:30:25+5:302020-04-01T21:31:26+5:30

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर कोरोना व्हायरसशी संबंधित प्रश्न विचारण्यात येत आहेत. यात धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. ‘पीआयबी’ने ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

Smokers at higher risk of coronas: Expert information | धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका : तज्ज्ञाची माहिती

धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका : तज्ज्ञाची माहिती

Next
ठळक मुद्देसरकारनेही वेधले लक्ष

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला सिगारेट पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर कोरोना व्हायरसशी संबंधित प्रश्न विचारण्यात येत आहेत. यात धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. ‘पीआयबी’ने ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर लोकांनी सिगारेट आणि तंबाखू खाल्ल्याने कोरोना व्हायरसचा धोका आहे का, असे प्रश्न विचारले होते. तज्ज्ञानुसार, सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन करण्यासाठी हात ओठाचा वापर केला जातो. यामुळे हा विषाणू पोटात जाऊ शकतो आणि कोरोनाची लागण होऊ शकते.
दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्पष्ट केले आहे की, सिगारेट व तंबाखूचे सेवन करणाºया व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका आहे. त्यामुळे हे व्यसन सोडावे. याबरोबरच पौष्टिक आहार, पूर्ण झोप घ्यावी. घरातच राहून नियमित व्यायाम करावा, असा सल्लाही दिला आहे.

धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा गंभीर धोका
धूम्रपान करणाऱ्यांना श्वसनासंबंधित आजाराची भीती असते. अशावेळी त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यास आजार गंभीर होऊ शकतो. शिवाय, तंबाखू चोळणे किंवा सिगारेट ओढताना हात हायजेनिक राहतातच असे नाही. विशेष म्हणजे, ‘लॉकडाऊन’मुळे सध्या सर्व पानठेले बंद आहेत. व्यसन सोडण्याची ही एक संधी आहे.
डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

धूम्रपानाचे व्यसन घातकच
तंबाखू व धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. यामुळे हे व्यसन घातकच आहे. विशेष म्हणजे, क़र्करोगाच्या रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. यामुळे या रुग्णाला कोरोना झाल्यास गंभीर परिणामाची भीती असते. सध्या कोरोनाचा संसर्ग सर्वत्र आहे. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी चेहऱ्याला वारंवार हात न लावण्याचे आवाहन केले जात आहे. यात जर कुणाला धूम्रपानाची सवय असेल तर त्याचे हात वारंवार ओठाला लागतील, यातून कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे हे व्यसन सोडणेच लाभदायक ठरेल.
डॉ. अशोक दिवाण
प्रमुख, कर्करोग विभाग, मेडिकल

Web Title: Smokers at higher risk of coronas: Expert information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.