सार्वजनिक ठिकाणावरील धूम्रपान, तंबाखूबंदीसाठी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:18+5:302021-07-16T04:08:18+5:30

नागपूर : सार्वजनिक स्थळी होणारे धूम्रपान व तंबाखू खाण्यावर कडक निर्बंध घालून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसे जनहित ...

Smoking in public places, demand for action to ban tobacco | सार्वजनिक ठिकाणावरील धूम्रपान, तंबाखूबंदीसाठी कारवाईची मागणी

सार्वजनिक ठिकाणावरील धूम्रपान, तंबाखूबंदीसाठी कारवाईची मागणी

Next

नागपूर : सार्वजनिक स्थळी होणारे धूम्रपान व तंबाखू खाण्यावर कडक निर्बंध घालून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसे जनहित कक्षाने शासकीय अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. सार्वजनिक स्थळी धूम्रपान व तंबाखूवर दंडात्मक कारवाईचे प्रावधान आहे. अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार असले तरी तसे होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालीही सात सदस्यीय समिती आहे, हे विशेष! मनसेप्रणीत जनहित कक्षाचे अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष इकबाल रिझवी यांच्या नेतृत्वात अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त, मनपाचे अतिरिक्त आयुक्त व राज्य परिवहन विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी सरचिटणीस महेश जोशी, शहर अध्यक्ष अरुण तिवारी, शहर उपाध्यक्ष विकास साखरे, विभाग अध्यक्ष पंकज तपासे उपस्थित होते.

Web Title: Smoking in public places, demand for action to ban tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.