ट्रकचालकांना व्यसनाधीन करण्यासाठी तस्कर सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:13 AM2020-07-11T00:13:09+5:302020-07-11T00:14:31+5:30

शहरातील मादक पदार्थ तस्करीच्या व्यवसायात गुंतलेले तस्कर आता ट्रान्सपोर्ट व्यवसायातही जुळले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असे संधिसाधू लोक त्यांचे स्वत:चे ट्रकचालक आणि इतर मालवाहू गाड्यांवरील चालकांना एमडी आणि इतर मादक पदार्थांच्या व्यसनाची सवय लावत आहेत.

Smugglers active to addict truck drivers | ट्रकचालकांना व्यसनाधीन करण्यासाठी तस्कर सक्रिय

ट्रकचालकांना व्यसनाधीन करण्यासाठी तस्कर सक्रिय

Next
ठळक मुद्देपोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी गंभीर : बातमीने मादक पदार्थ तस्करांमध्ये खळबळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहरातील मादक पदार्थ तस्करीच्या व्यवसायात गुंतलेले तस्कर आता ट्रान्सपोर्ट व्यवसायातही जुळले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असे संधिसाधू लोक त्यांचे स्वत:चे ट्रकचालक आणि इतर मालवाहू गाड्यांवरील चालकांना एमडी आणि इतर मादक पदार्थांच्या व्यसनाची सवय लावत आहेत. ही वाहने शहराचा आऊटर रिंग रोड तसेच कामठी, कन्हान भागातून चालविली जात आहेत. या गाड्यांमध्ये तस्करीचा माल किंवा जनावरांची वाहतूकही केली जात आहे.
अशा अवैध कारभारात गुंतलेली वाहने पोलिसांच्या कारवाईतून सुटण्यासाठी रात्री उशिरा गाड्या काढून लांब प्रवासाला निघत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ट्रकचे चालक मादक पदार्थांचे सेवन केल्यानंतर नशेत कुठेही न थांबता शेकडो किलोमीटरचा प्रवास करून निर्धारीत ठिकाणी पोहचतात. अशाप्रकारे तस्करांना त्यांचा माल निर्धारीत ठिकाणी पोहचविण्यासाठी व्यसनाधीन वाहनचालकांची मदत होते आणि असे चालक सहज त्यांना उपलब्ध होतात. नशा केल्यानंतर हे वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवितात. यादरम्यान कुणी मध्ये आला तरी गाडी थांबविली जात नाही.
विशेष म्हणजे लोकमतने मादक पदार्थ तस्करांविरोधातील कारवाई मंद पडल्याची बातमी देताच तस्करीत गुंतलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. हे आरोपी पोलीस कारवाईचा धोका लक्षात घेत त्यांच्या हितसंबंधातील व्यक्तींशी संपर्क वाढविला आहे.

त्यांचे लक्ष्य तरुण पिढी
मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्यांसाठी तरुण पिढी प्रमुख लक्ष्य आहे. सूत्रानुसार काही वर्षापासून महाविद्यालयीन तरुण-तरुणींना एमडी पावडरची विक्री केली जात आहे. या धंद्यात स्पर्धा वाढल्याने काही तस्करांनी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व्यसनाधीन बनविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यासाठी आधीच व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणींची मदत घेतली जात आहे.

Web Title: Smugglers active to addict truck drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.