नागपुरात माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:46 AM2018-10-25T00:46:47+5:302018-10-25T00:47:36+5:30

लकडगंज पोलिसांनी एका माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी करणाऱ्या टोळीस पकडले आहे. पोलिसांनी या टोळीसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या दोन युवकांना अटक करीत कारसह सव्वातीन लाखाचा माल जप्त केला.

Smuggling alcohol by former corporator's istigation in Nagpur | नागपुरात माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी

नागपुरात माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी

Next
ठळक मुद्देदोन आरोपीस अटक : लकडगंज पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंज पोलिसांनी एका माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी करणाऱ्या टोळीस पकडले आहे. पोलिसांनी या टोळीसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या दोन युवकांना अटक करीत कारसह सव्वातीन लाखाचा माल जप्त केला.
शजेद खान ऊर्फ समीर ऊर्फ धवन ऊर्फ परवेज खान (२०) रा. ताजाबाद आणि कुणाल संजय मेश्राम (२३) रा. रमाईनगर जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा प्रमुख ताजनगर टेका येथील पिंटू खान हा फरार आहे. पोलिसांनी मेहंदीबाग पुलाजवळ होंडा सिटी कारला रोखले. कारची झडती घेतली असता त्यात ५४ हजाराची दारू सापडली. पोलिसांनी कार चालकासह त्याच्या साथीदरास अटक केली. त्यांनी पिंटू खानच्या इशाऱ्यावर ही दारू चंद्रपूरला पोहोचवीत असल्याचे सांगितले. पोलीस सक्रिय होताच पिंटू फरार झाला. त्याने कार यांच्याकडे सोपविली ही कार घेऊन चंद्रपूरला जायचे होते. तिथे पिंटू फोन करणार होता. यानंतर डिलिव्हरी घेणारा त्यांच्याकडे येणार होता. दुसऱ्यांदा ते चंद्रपूरला दारू घेऊन जाणार होते. याच्या मोबदल्यात चालकाला दीड हजार रुपये व त्याच्या साथीदरास ५०० रुपये मिळणार होते. पिंटू हा पूर्व नागपुरातील एका नगरसेवकाचा जावई आहे. काही दिवसांपासून तो बेरोजगार आहे. त्यामुळे दारू तस्करी करतो. ही कारवाई ठाणेदार संतोष खांडेकर, पीएसआय प्रफुल गाडेकर, एएसआय रवी राठोड, हवालदार प्रकाश सिडाम, दीपक कारोकार, राम यादव, सुनील ठवकर, हिरात राठोड, भूषण झाडे, फिरोज खान आणि संदीप शिरफुले यांनी केली.

Web Title: Smuggling alcohol by former corporator's istigation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.