ऑटोतून बंदी असलेल्या तंबाखुची तस्करी, पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

By योगेश पांडे | Published: November 5, 2023 03:46 PM2023-11-05T15:46:12+5:302023-11-05T15:46:26+5:30

योगेश पांडे - नागपूर नागपूर : नागपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये लाखो रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. ...

Smuggling of banned tobacco from autos, police action at two places | ऑटोतून बंदी असलेल्या तंबाखुची तस्करी, पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

ऑटोतून बंदी असलेल्या तंबाखुची तस्करी, पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

योगेश पांडे - नागपूर

नागपूर : नागपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये लाखो रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. एका ठिकाणी तर ऑटोतून बंदी असलेल्या तंबाखुची तस्करी सुरू होती. यशोधरानगर व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनने या दोन्ही कारवाया केल्या.

शनिवारी आठ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गणेशेपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना राजवाडा पॅलेससमोरील मार्गावर ऑटोमध्ये संशयास्पद मालाची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी एमएच ३१ एफयू ७९३४ या क्रमांकाच्या ऑटोला थांबविले. बैजुराम रंगूराम फटिंग (४२, वैष्णोदेवीनगर, कळमना) हा चालक ऑटो चालवत होता. ऑटोतून प्रतिबंधित तंबाखू व वेगवेगळे फ्लेवर्स आढळून आले. पोलिसांनी २.०७ लाखांचा तंबाखू जप्त केला. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता रुपेश जेठानी (जरीपटका) याच्या सांगण्यावरून माल घेऊन जात असल्याचे फटिंगने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून तंबाखू व ऑटो जप्त केला. त्याला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले व जेठानीचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्ष मुकुंद ठाकरे, देवकाते, खोरडे, चौधरी, मुकेश राऊत, प्रविण लांडे, अनुप तायवाडे, संतोष चौधरी, अमोल जासुद, विनोद गायकवाड, अनिल बोटरे व मनिष रामटेके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यशोधरानगरातील घरात तंबाखुची साठेबाजी
दरम्यान शनिवारी दुपारी चार वाजता यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने हमीदनगर येथील प्लॉट क्रमांक ६०० येथून ८६ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला. खबऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी मोहम्मद शगीर मोहम्मद नजीर (५३) याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरात प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये तंबाखू लपविण्यात आला होता. अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.ए.एन.खंदारे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, काळिंगे, सचिन भालेराव, श्याम कडू, अमोल भांबुरकर, मंगेश गिरी, किशोर धोटे, रामेश्वर गेडाम, रोहीत रामटेके, अक्षय कुळसंगे, नारायण कोहचडे,, नरेंद्र, किशोर धोटे व अमित ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

Web Title: Smuggling of banned tobacco from autos, police action at two places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.