वाघाच्या दातांची तस्करी, ४ आराेपी जेरबंद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:57+5:302021-08-29T04:11:57+5:30
विजय हरिभाऊ वाघ (३३, रा. बुटीबाेरी), परसराम नंदू बिजवे (३६, रा. तास), गणेश देवीदास रामटेके (२८, रा. बाेर्डकला) व ...
विजय हरिभाऊ वाघ (३३, रा. बुटीबाेरी), परसराम नंदू बिजवे (३६, रा. तास), गणेश देवीदास रामटेके (२८, रा. बाेर्डकला) व दीक्षानंद दिलीप राऊत (रा. मसाळा, ता. चिमूर) अशी अटक झालेल्या आराेपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर-चंद्रपूर महामार्ग क्र. ७ वर वाघाच्या दातांची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती बुटीबाेरी वनपरिक्षेत्राला मिळाली. या माहितीच्या आधारे शुक्रवारी वनविभागाने सापळा रचून तीन आराेपींना वाघाच्या दातांसह अटक केली. यानंतर शनिवारी मसाळा येथून चाैथ्या आराेपीला अटक करण्यात आली. चारही आराेपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत वनकाेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात झालेल्या कारवाईत बुटीबाेरी वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही. ठाेकळ, वनपाल केकान, एस.व्ही. नागरगाेजे, मुंडे, टवले, शेंडे, चव्हाण यांचा सहभाग हाेता. सहायक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार हे पुढील तपास करीत आहेत.