मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर निघाला साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:25 AM2018-09-18T00:25:05+5:302018-09-18T00:26:33+5:30
महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्यावर सोमवारी आठ फूट लांबीचा साप निघाला. यामुळे तैनात सुरक्षा रक्षक व कर्मचारी घाबरले. त्यांनी याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित्र घटनास्थळी पोहचले. त्यांनी आठ फूट लांबीच्या धामणला पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्यावर सोमवारी आठ फूट लांबीचा साप निघाला. यामुळे तैनात सुरक्षा रक्षक व कर्मचारी घाबरले. त्यांनी याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित्र घटनास्थळी पोहचले. त्यांनी आठ फूट लांबीच्या धामणला पकडले.
महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने पोलीस नियंत्रण कक्षाला बंगल्यावर साप निघाल्याची सूचना दिली. नियंत्रण कक्षाकडून सर्पमित्र शुभम पावडे यांना सायंकाळी ५ वाजता याबाबत माहिती देण्यात आली. थोड्याच वेळात पावडे आयुक्तांच्या बंगल्यावर पोहचले. बंगल्याच्या आवारात साप फिरत होता. पावडे यांनी १० मिनिटात धामणला पकडून पोत्यात बंद केले. यावेळी बंगल्यावर तीन महिला, दोन पुरुष कर्मचारी व मुलगा उपस्थित होता.
धामण विषारी नाही. सहा फुटाच्या धामणने चावा घेतला तर थोडी जखम होते. परंतु कोणतेही नुकसान होत नाही. आयुक्तांच्या बंगल्यावर पकडेला साप हा बिनविषारी असल्याची माहिती पावडे यांनी दिली.