बंद शाळांमध्ये साप-विंचवाचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:52+5:302021-09-17T04:12:52+5:30

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च ...

Snake-scorpion scare in closed schools | बंद शाळांमध्ये साप-विंचवाचा धाेका

बंद शाळांमध्ये साप-विंचवाचा धाेका

Next

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या आवारात तसेच इमारतीच्या सभाेवती माेठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. काही शाळांच्या आवारात घाणही साचली आहे. बहुतांश शाळा गावाच्या टाेकावर व शेतालगत असल्याने त्या गवतात तसेच वर्गखाेल्यांमध्ये साप, विंचू व इतर विषारी सरपटणारे प्राणी व कीटकांचा धाेका वाढला आहे.

काेराेना संक्रमणामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा एप्रिल २०२० पासून बंद करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून या काळात ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. ऑगस्ट २०२१ पासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात असून, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईनच सुरू ठेवण्यात आले.

नरखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ११५ शाळा आहेत. त्यांची एकूण पटसंख्या ४,७८४ एवढी आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शाळेत येणेही बंद आहे. त्यामुळे वर्गखाेल्यांचे कुलूप दीड वर्षापासून उघडलेलेच नाही. साेबतच शाळेच्या आवारातील वर्दळ फार कमी झाली. त्यामुळे आवारात माेठ्या प्रमाणात गवत वाढले असून, कचरा साचला आहे. त्यामुळे शाळेचा आवार व वर्गखाेल्यांमध्ये साप व विंचवांचा धाेकाही वाढला आहे.

....

वर्गखोल्यांमध्ये धुळीचे साम्राज्य

जिल्हा परिषदेच्या शाळांची साफसफाई ही शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांच्या मदतीने लाेकसहभागातून केली जाते. शाळेच्या इमारतींची किरकाेळ दुरुस्ती व सुविधांची निर्मितीदेखील शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांच्या माध्यमातून केली जाते. शाळा बंद असल्याने बंद वर्गखोल्यांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही शाळांच्या खिडक्या व दारे खराब झाली आहेत.

....

शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती

नरखेड तालुक्यातील ११५ जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण ३०९ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळा बंदकाळात यातील ५० टक्के शिक्षकांची शाळांमध्ये राेज उपस्थिती असणे शासनाने अनिवार्य केले हाेते. या उपस्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर साेपविली आहे. शाळा व परिसर साफ ठेवण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची आहे. ते कार्यानुभवच्या तासिकेत विद्यार्थ्यांकडून ही कामे करवून घ्यायचे. आता दीर्घ काळापासून शाळा बंद असल्याने ही कामे करणार काेण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...

दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे वर्गखोल्यात धूळ व कचरा साचला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व वर्गखोल्या आणि शाळांचा संपूर्ण परिसर पूर्णपणे व्यवस्थित साफ केला जाईल.

- विशाल गौर, गटशिक्षणाधिकारी

पंचायत समिती, नरखेड.

Web Title: Snake-scorpion scare in closed schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.