एसएनडीएलची हद्दपारी निश्चित, महावितरण तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:08 AM2019-09-06T11:08:09+5:302019-09-06T11:10:55+5:30

नागपूर शहरातील वीज वितरणाची जबबदारी सांभाळत असलेल्या एसएनडीएलचे जाणे आता निश्चित झाले आहे.

SNDL deportation fixed, Mahadevran ready | एसएनडीएलची हद्दपारी निश्चित, महावितरण तयार

एसएनडीएलची हद्दपारी निश्चित, महावितरण तयार

Next
ठळक मुद्देदिवसभर बैठका, कुठल्याही क्षणी निर्णय फ्रेन्चाईजीचे कर्मचारी आणि व्हेंडर उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वीज वितरणाची जबबदारी सांभाळत असलेल्या एसएनडीएलचे जाणे आता निश्चित झाले आहे. महावितरणने अजूनपर्यंत तसा निर्णय घेतलेला नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर महावितरण कारभार आपल्या हाती घेणार की नाही, हे सांगता येत नाही. परंतु सूत्रानुसार मुंबईतून हिरवी झेंडी मिळाली असून कुठल्याही क्षणी महावितरण एसएनडीएलकडून जबाबदारी घेईल, असे सांगितले जाते. या दरम्यान एसएनडीएलचे कर्मचारी आणि व्हेंडर गुरुवारी दिवसभर थकीत वेतनाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते.
एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने गेल्या १२ आॅगस्ट रोजी महावितरणला पत्र लिहून कामकाज सांभाळण्याबाबत असमर्थतादर्शविली होती. मधला मार्गही निघू शकला नाही. त्यामुळे महावितरणने कार्यभार सांभाळण्याची तयारी सुरू केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा एसएनडीएल जाण्याची वेळ आली असल्याची पुष्टी करीत आहेत. बुधवारी कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर आज गुरुवारी एसएनडीएलचे कर्मचारी व व्हेंडर महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयावर धडकले. पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यादरम्यान महावितरणचे प्रभारी संचालक दिलीप घुगल आणि एसएनडीएलचे बिजनेस हेड सोनल खुराना यांनी व्हेंडर व कर्मचाऱ्यांशी वेगवेगळी भेट घेऊन चर्चा केली. एस्सेल युटिलीटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांच्यासोबतही त्यांचे बोलणे करून देण्यात आले. माहेश्वर यांनी व्हेंडर्सना त्यांची थकीत रक्कम देण्याचे आश्वासन देत मुंबईला बोलावले. परंतु व्हेंडर यांचे समाधान झाले नाही. घुगल यांनी कर्मचाऱ्यांना काम करीत राहण्याचे आवाहन करीत त्यांना भविष्याबाबत चिंता करू नका, असे सांगितले.

बिल प्रिंटींग रोखले
महावितरणने एसएनडीएलला ई-मेल पाठवून त्यांना बिल प्रिंट करून वितरण करण्यास मनाई केली आहे. विशेष म्हणजे ७ सप्टेंबरपासून बिल वाटणे सुरु होणार होते. सध्या बिलांवर एसएनडीएलचे नाव आहे. अशा परिस्थितीत कार्यभार सांभाळण्याची वेळ आली तर बिल महावितरण वाटू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर बिल वितरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

व्हेंडर आजपासून संपावर
एसएनडीएलचे विविध काम करणाºया व्हेंडर्सनी गुरुवारी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून काम बंद करण्याचे जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी वीज पुरवठा प्रभावित झाला आणि नागरिकांना त्रास झाला तर यासाठी महावितरण आणि एसएनडीएल जबाबदार राहतील. एसएनडीएलवर त्यांची असलेली थकीत रक्कम ५० कोटी रुपयावर पोहोचली आहे. त्यांच्या थकीत रकमेची गॅरंटी घेतली जावी, अशी त्यांची मागणी आहे. यादरम्यान मिलिंद बोरेकर, प्रकाश गजभिये, कुमार वैभव, गजानन नासरे आदी उपस्थित होते.

Web Title: SNDL deportation fixed, Mahadevran ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.