.... तर, राज्यातील २२ जिल्ह्यांना जाणवू शकतो क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 07:30 AM2021-11-03T07:30:00+5:302021-11-03T07:30:02+5:30

Nagpur News २२ जिल्ह्यांना औषधीचा पुरवठा करणाऱ्या नागपुरातील राज्य औषधी भांडाराची इमारतच मोडकळीस आल्याने व तातडीने जागा उपलब्ध न झाल्यास, पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

.... So, 22 districts in the state may experience shortage of TB drugs | .... तर, राज्यातील २२ जिल्ह्यांना जाणवू शकतो क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा

.... तर, राज्यातील २२ जिल्ह्यांना जाणवू शकतो क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा

Next
ठळक मुद्देआरोग्यसेवा राज्य औषधी भांडाराची इमारत पाडणार


सुमेध वाघमारे
नागपूर : राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या राज्य औषधी भांडाराची इमारत मोडकळीस आल्याने, बांधकाम विभागाने इमारत पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापूर्वी भांडाराला नवीन जागा उपलब्ध न झाल्यास, २२ जिल्ह्यांना होणारा क्षयरोग औषधांचा पुरवठा ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगाच्या एकूण रुग्णांपैकी २६ टक्के रुग्ण भारतात आढळतात. त्यापैकी ७० टक्के रुग्ण १५ ते ५४ वयोगटांतील आहेत. महाराष्ट्रात २०१७ मध्ये क्षयरोगाचे १,६४,७४३ रुग्ण होते. आता हा आकडा ३ लाखांजवळ पोहोचला आहे. क्षयरोग हा औषधोपचाराने बरा होणारा आजार आहे. यासाठी सरकार रुग्णांना मोफत औषधी, मोफत तपासणी, रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवास भत्ता व निक्षय पोषण योजनेतून दरमहा ५०० रुपये खात्यात जमा करते. नऊ महिन्यांपासून ते दीड वर्षापर्यंत क्षयरोगावर औषधोपचार आवश्यक ठरतो. औषधी मध्येच बंद केल्यास शरीरातील जंतू टीबीच्या औषधांना पुन्हा दाद देत नाहीत. यामुळे क्षयरोगाच्या रुग्णांसाठी नियमित औषधी महत्त्वाची ठरते, परंतु २२ जिल्ह्यांना औषधीचा पुरवठा करणाऱ्या नागपुरातील राज्य औषधी भांडाराची इमारतच मोडकळीस आल्याने व तातडीने जागा उपलब्ध न झाल्यास, पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

-२०११ पासून औषधी पुरवठा

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात २०११ पासून राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या वतीने आरोग्यसेवाच्या राज्य औषधी भांडारातून विदर्भासह, मराठवाड्यातील जिल्ह्यांना डॉट प्लस औषधांचा पुरवठा केला जातो. मेडिकलने नियमानुसार नुकतेच टीबी वॉर्ड परिसरातील इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. त्यात मेडिकलचे क्षयरोगाचे वॉर्ड, ओपीडीसह राज्य भांडाराची इमारत मोडकळीस आल्याचे स्पष्ट केले आहे.

- जागनाथ बुधवारी किंवा मनोरुग्णालयात होऊ शकते भांडार

मेडिकलच्या बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला औषधी भांडाराची इमारत पाडण्याच्या सूचना केल्या आहेत. याला गंभीरतेने घेत, औषधी भांडाराचे अधिकारी पयार्यी जागेचा शोध घेत आहेत. एका अधिकाऱ्यांने सांगितले, जागनाथ बुधवारी येथील जिल्हा क्षयरोग केंद्र किंवा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर बांधकाम करून, तिथे राज्य औषधी भांडार स्थानांतरित करता येऊ शकते, परंतु यासाठी वरच्या स्तरावर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

Web Title: .... So, 22 districts in the state may experience shortage of TB drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य