...तर भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, उद्धव ठाकरेंनी राजकारणाची मर्यादा पाळावी; बावनकुळे यांचा इशारा

By योगेश पांडे | Published: September 12, 2023 01:30 AM2023-09-12T01:30:20+5:302023-09-12T01:30:51+5:30

"उद्धव ठाकरे यांची भाषा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणारी आहे. त्यांनी राजकारणाची मर्यादा पाळावी."

So BJP workers will lose patience, Uddhav Thackeray should follow the limits of politics Bawankule's warning | ...तर भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, उद्धव ठाकरेंनी राजकारणाची मर्यादा पाळावी; बावनकुळे यांचा इशारा

...तर भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, उद्धव ठाकरेंनी राजकारणाची मर्यादा पाळावी; बावनकुळे यांचा इशारा

googlenewsNext

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची भाषा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणारी आहे. त्यांनी राजकारणाची मर्यादा पाळावी. ते ज्या पद्धतीने भाजप नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत ते पाहता भाजप कार्यकर्ते कधी संयम सोडतील हे सांगता येत नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला आहे. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कुणबी-मराठा हे भावासारखे राहतात. त्यामुळे दोन भावांत वाद निर्माण करणे चुकीचे आहे. याबाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेईल. राज्यात शांतता रहावी हाच आमचा प्रयत्न आहे. मात्र उद्धव ठाकरे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केवळ आरोप करायचे आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करणे हेच त्यांचे काम आहे, असा आरोप बावनकुळे यांनी लावला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या विदेशदौऱ्यांबाबतदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी दर महिन्याला विदेशात का जातात, हा संशोधनाचा विषय आहे. पुढच्या वेळी विदेश दौऱ्यावर जातील, तेव्हा त्यांनी त्यांच्या विदेश दौऱ्याविषयी १४० कोटी भारतीयांना माहिती द्यावी, असेही बावनकुळे म्हणाले.
 

Web Title: So BJP workers will lose patience, Uddhav Thackeray should follow the limits of politics Bawankule's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.