- तर सिद्ध होतो आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:40 PM2020-11-13T12:40:45+5:302020-11-13T12:42:55+5:30

Court Nagpur News आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा, रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यामुळे देशभर चर्चेत आला आहे.

- So the crime of inciting suicide is proved | - तर सिद्ध होतो आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा

- तर सिद्ध होतो आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा

Next
ठळक मुद्देकायदेतज्ज्ञांची माहिती चिठ्ठीमध्ये आरोपीचे नाव असणे पुरेसे नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा, रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यामुळे देशभर चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील कायदेतज्ज्ञ ऍड. शशिभूषण वहाणे व ऍड. राजेंद्र डागा यांच्याकडून सदर गुन्ह्याची माहिती घेतली असता, त्यांनी सदर गुन्हा सिद्ध होण्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रसंगाचे ठोस पुरावे आवश्यक असल्याचे सांगितले. संबंधित प्रसंग निश्चित स्वरुपाचे असावे. प्रसंगाची माहिती मोघम स्वरुपाची नसावी असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पीडित व्यक्तीने, मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये, एखाद्या व्यक्तीमुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख करणे, ही केवळ एक बाब सदर गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेशी नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे म्हणजे काय, याची व्याख्या भादंविच्या कलम १०७ मध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवृत्त करण्याच्या कृतीमध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी उत्तेजित करणे, एखादी गोष्ट करण्यासाठी इतर व्यक्तींसोबत कट रचणे किंवा एखाद्या व्यक्तीस एखादी गोष्ट करण्यासाठी हेतूपुरस्सर मदत करणे या बाबींचा समावेश होतो. यापैकी कोणत्याही एक बाबीचे अस्तित्व आढळून आल्यास ती एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त करण्याची कृती ठरते. आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी या व्याख्येत बसणारी कृती आवश्यक आहे. याशिवाय प्रवृत्त करण्याचे प्रसंग निश्चित व विशिष्ट स्वरुपाचे, अखंडित आणि ताजे असले पाहिजे. एखाद्या खूप जुन्या प्रसंगामुळे आत्महत्या केल्याचे कुणी म्हणत असल्यास त्याला विशेष महत्त्व दिले जात नाही. एवढेच नाही तर, एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करावी हा आरोपीचा उद्देश असणे आणि त्यासाठी त्याने गुन्हेगारी प्रवृत्तीने वागणेदेखील गरजेचे आहे, असे ऍड. वहाणे व ऍड. डागा यांनी सांगितले.

दहा वर्षे कारावासाची शिक्षा

आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यात १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने संजयसिंग सेंगर, मदनमोहन सिंग, सोमा सुंदर यासह अन्य अनेक प्रकरणांमध्ये सखोल स्पष्टीकरण दिले आहे.

Web Title: - So the crime of inciting suicide is proved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.