.. तर विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य : नितीन गडकरी

By मोरेश्वर मानापुरे | Published: January 29, 2024 09:51 PM2024-01-29T21:51:04+5:302024-01-29T21:51:27+5:30

: विदर्भात खारे आणि गोडे, असे दोन्ही स्वरूपाचे जलाशय आहेत. त्याद्वारे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे.

So export of 50 thousand crores is possible from Vidarbha says Nitin Gadkari | .. तर विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य : नितीन गडकरी

.. तर विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य : नितीन गडकरी

नागपूर : विदर्भात खारे आणि गोडे, असे दोन्ही स्वरूपाचे जलाशय आहेत. त्याद्वारे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून वर्षाकाठी २ हजार कोटींची निर्यात होऊ शकत असेल तर विदर्भातून ५० हजार कोटींची निर्यात शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटतर्फे (एड) आयोजित आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सव-अ‍ॅडव्हांटेज विदर्भच्या तिसऱ्या दिवशी मत्स्योत्पादनावर विशेष चर्चासत्र झाले. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र वायडा, पुल्केश कदम, प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे, सीआयएफईच्या प्राध्यापिका अर्पिता शर्मा, एटूएसटू एंटरप्रायजेसचे सहसंस्थापक अमोल साळगावकर, एमएम फिश सीड कल्टिव्हेशन कंपनीचे संचालक सुखदेव मंडल, ऑस टेक इंडस्ट्रिजचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम देशमुख उपस्थित होते.

पुल्केश कदम म्हणाले, शोभिवंत माशांचे उत्पादन कमीत कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न देणारे आहे. पारंपारिक मत्स्योत्पादनाला प्रक्रिया उद्योगांची जोड देण्याची गरज आहे. विक्रम देशमुख यांनी मॉडर्न अ‍ॅक्वाकल्चर प्रॅक्टिसेसबाबत मार्गदर्शन केले. मत्स्यशेतीवर दीर्घकाळापासून संशोधन करणारे डॉ. उल्हास फडके यांच्या ‘इकॉनॉमिक्स ऑफ इनलँड फिशरीज’ या पुस्तकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. चर्चासत्राचे संचालन डॉ. प्रकाश मालगावे यांनी केले.

तलावांची व्हावी स्वच्छता

पारंपरिक मत्स्यशेती करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना मत्स्योत्पादक प्रभाकर मांढरे म्हणाले, मत्स्यशेतीकरिता तलावांची स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे. तलावातील गाळ काढल्यास मत्स्यशेती अधिक दर्जेदार होईल. मागणीच्या तुलनेत मत्स्यबीजांचा पुरवठा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: So export of 50 thousand crores is possible from Vidarbha says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.