आतापर्यंत १८.६४ लाख क्विंटल कापसाची खरेदी : जिल्हाधिकारी ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 07:47 PM2020-06-12T19:47:49+5:302020-06-12T19:49:49+5:30
कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ, सी. सी. आय. आदी मार्फत जिल्ह्यातील ८९,९२४ शेतकऱ्यांपासून आतापर्यंत १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कापसाची पूर्ण खरेदी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ, सी. सी. आय. आदी मार्फत जिल्ह्यातील ८९,९२४ शेतकऱ्यांपासून आतापर्यंत १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कापसाची पूर्ण खरेदी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून जिल्ह्यात कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडे असलेला कापूस खरेदी करण्यासाठी सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे सुरू राहणार आहेत. कापूस खरेदी योजनेंतर्गत दहा तालुक्यात कापूस पणन महासंघ व सी. सी. आय. मार्फत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापसाची खरेदी करण्यात येत आहे. कापूस पणन महासंघातर्फे नोंदणी केलेल्या १६, ८६० शेतकऱ्यांकडून ४ लाख ८ हजार ४५५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सी. सी. आय. मार्फत ३.७०५ शेतकऱ्यांकडून १ लाख २४ हजार ९०४ क्विंटल तसेच खासगी बाजाराच्या माध्यमातून ५,२९३ शेतकऱ्यांकडून ८१,८९६ क्विंटल, थेट परवानाधारक २,०२० शेतकऱ्यांपासून ४२,७४० क्विंटल तसेच खासगी समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी ६१,३९९ शेतकऱ्यांकडून १२ लाख ६ हजार १९१ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
३०,२८६ शेतकऱ्यांचा १८,२६१ क्विंटल कापूस खरेदी शिल्लक
नोंदणी केलेल्या ३०,२८६ शेतकऱ्यांकडील १८,२६१ क्विंटल कापूस अद्याप खरेदी शिल्लक आहे. कोविड-१९च्या आधी ५७,७०५ शेतकऱ्यांकडून १२ लाख १८ हजार ३४६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. कोविड-१९ नंतर ३२ हजार २१९ शेतकऱ्यांसाठी ६ लाख ४५ हजार ८४३ क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.