‘लाडकी बहीण योजने’साठी आतापर्यंत ६.५७ लाख अर्ज

By आनंद डेकाटे | Published: July 19, 2024 04:43 PM2024-07-19T16:43:53+5:302024-07-19T16:44:27+5:30

नागपूर विभागात उत्तर प्रतिसाद, १४,६३७ मदतकेंद्र : माहितीसाठी १८१ हेल्पलाईन

So far 6.57 lakh applications for 'Ladki Bahin Yojana' | ‘लाडकी बहीण योजने’साठी आतापर्यंत ६.५७ लाख अर्ज

So far 6.57 lakh applications for 'Ladki Bahin Yojana'

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला नागपूर विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ६ लक्ष ५७ हजार ९९४ महिलांनी अर्ज सादर केले आहेत. आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यातील आहेत. या योजनेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवता यावा यासाठी १४,६३७ मदतकेंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.


महिला व बाल विकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’मध्ये २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांना दरमहा १,५०० रुपये इतकी रक्कम आधारलिंक असलेल्या बॅक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी ‘ नारीशक्ती दूत’ ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रशासनातर्फे महिलांना सुलभपणे योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करता यावे यासाठी मदतकेंद्र सुरु केले आहेत. या मदत केंद्रावर पुरेशे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहेत.


विभागात आजपर्यंत २ लाख ५२ हजार ५७ अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून ४ लाख ५ हजार ९३७ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहेत.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी १८१ हा महिला हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यावर योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

जिल्हानिहाय अर्ज व मदत केंद्र
जिल्हा             अर्ज सादर                मदत केंद्र

नागपूर              २,७६,९१६                  ३,४०४
गडचिरोली         १,४६,५२६                 २,३८६
वर्धा                    ४५,५७७                   १,६२७
भंडारा                ६३, ३५६                   १,४१७
गोंदिया               ८५, २१५                   १,९०२
चंद्रपूर                ४०,४०४                   २, ३८६

 

Web Title: So far 6.57 lakh applications for 'Ladki Bahin Yojana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.