- तर कशी होणार घोषणांची अंमलबजावणी?

By admin | Published: June 16, 2017 01:55 AM2017-06-16T01:55:13+5:302017-06-16T01:55:13+5:30

महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा फटका शहरातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना बसला आहे. पर्याय म्हणून

- So how will the announcements be implemented? | - तर कशी होणार घोषणांची अंमलबजावणी?

- तर कशी होणार घोषणांची अंमलबजावणी?

Next

मनपाची तिजोरी रिकामी : प्रलंबित प्रकल्पांना हवे बूस्ट, शनिवारी अर्थसंकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा फटका शहरातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना बसला आहे. पर्याय म्हणून प्रशासनाने काही प्रकल्प खासगी सहभागातून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सर्वच प्रकल्प शंभर टक्के खासगी सहभागातून राबविणे योग्य नाही. याचा विचार करता वर्षानुवर्ष रखडलेल्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून आर्थिक बूस्ट देण्याची गरज आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, शहर बस वाहतूक सक्षम करणे, शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण,बाजार संकुलाचे निर्माण, उद्यानांचा विकास, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, आॅरेंज सिटी स्ट्रीट असे प्रक ल्प रखडलेले आहेत. घनकचरा व्यवस्थापन, महिलांसाठी शौचालय,सुलभ शौचालये, श्रीमंत राजे रघुजी भोसले. सभागृहाचे नवीन बांधकाम,नगरभवन सभागृहाचे बांधकाम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच शहर विकास योजनेतील प्रस्तावित प्रकल्प निधीअभावी रखडलेले आहेत.
घनकचरा व्यवस्थापन व शौचालयासारखे विकास प्रकल्प रखडल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात २०४८ कोटीचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५४६ कोटींचा महसूल जमा झाला होता.
अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ५०० कोटींची तूट निर्माण झाली. याचा विकास योजनांवर परिणाम झाला आहे.

तलावांचे संवर्धन कधी होणार?
नागपूर शहरात ११ तलाव आहेत. गांधीसागर, फुटाळा, पांढराबोडी, सक्करदरा, सोनेगाव, नाईक तलाव अशा प्रमुख तलावांच्या संवर्धनाची गरज आहे. महापालिकेचे आर्थिक स्रोत विचारात घेता यासाठी निधी उपलब्ध करणे शक्य नाही. परंतु टप्प्याटप्प्याने तलावांचे संवर्धन शक्य आहे. तलावातील अनावश्यक गाळ काढून खोलीकरण करणे, पाणथळ क्षेत्राची धूप रोखण्यासाठी आणि तलावाची गुणवत्ता टिकवण्याकरिता उपाययोजना करणे, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, तलावाच्या किनाऱ्याचे सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे यासाठी नियोजनाची गरज आहे. लक्ष्य निर्धारित करून अर्थसंकल्पात यासाठी तरतुदीची गरज आहे.


उद्यानांची निर्मिती व्हावी :देशभरातील हिरव्यागार शहरात नागपूरचा समावेश आहे. यात उद्यान विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. शहरात १५१ उद्याने आहेत. यातील ९१ उद्याने महानगरपालिका, ६१ नागपूर सुधार प्रन्यास, तीन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची तर एक उद्यान वन विभागाच्या मालकीचे आहे. शहराचा विस्तार व विकास विचारात घेता शहरात नवीन उद्यानांची निर्मिती करणे गरजेचे आहे. १० नवीन उद्यानांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव होता. परंतु याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

रुग्णालयांसाठी तरतुदीची गरज
शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु महापालिके च्या रुग्णालंयाची अवस्था बिकट आहे. सुविधा व यंत्रसामुग्रीचा अभाव, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे यामुळे गरजू व गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळत नाही. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्याची गरज आहे.

Web Title: - So how will the announcements be implemented?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.