तर महापौरांना कुटुंबासह संपवू : सदर पोलिसात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 11:08 PM2019-12-07T23:08:51+5:302019-12-08T00:35:26+5:30

महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्विकारताच कामाचा धडाका लावला आहे. परंतु त्यांच्या चांगल्या कामामुळे समाज कंटक बिथरले असून जोशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे.

So let's end the mayor with family: file a complaint with the police Sadar | तर महापौरांना कुटुंबासह संपवू : सदर पोलिसात तक्रार दाखल

तर महापौरांना कुटुंबासह संपवू : सदर पोलिसात तक्रार दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देअतिक्रमण कारवाईमुळे बिथरलेल्या समाज कंटकांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौरसंदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्विकारताच कामाचा धडाका लावला आहे. नागपूर शहर स्वच्छ व सूंदर करण्यासोबतच अतिक्रमणाला निर्बंध घालण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक व विविध सामाजिक संस्थांना विश्वासात घेवून व चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या चांगल्या कामामुळे समाज कंटक बिथरले असून जोशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी सदर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून ते आरोपीचा शोध घेत आहे.


जोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील नागरिक व विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘वॉक अ‍ॅण्ड टॉक विथ मेयर’ आणि ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ अशा स्वरूपाचे उपक्रम राबविले. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहरात विविध भागात १०० तक्रार बॉक्स लावले. यातीलच हल्दीराम रेस्टारेन्ट शेजारील मेश्राम पुतळा चौक येथे लावण्यात आलेल्या ९६ क्रमाकांच्या तक्रार बॉक्समध्ये या आशयाचे धमकीपत्र टाकण्यात आले होते. तक्रारिंची छाणनी करताना हे धमकी पत्र निदर्शनास आले.
शहरातील अतिक्रमणामुळे रस्ते अपघात होत आहेत. वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही. यामुळे नागरिक त्रस्त असल्याने अतिक्रमण हटविण्याशिवाय पर्याय नाही. यात पोलीस विभागाचीही मदत घेतली जाणार आहे. शनिवारी ७ डिसेंबरला आयोजित महापालिकेच्या विशेष सभेत अतिक्रमण, स्वच्छता यावर जोशी यांनी चर्चा घडवून आणली. २० डिसेंबरच्या सभेत यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच शहर स्वच्छ सूंदर होण्यालाही मदत होणार आहे.
शहरातील विविध भागात अवैधरित्या होर्डींग लावून शहर विद्रुप करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय संदीप जोशी यांनी घेतला. विशेष म्हणजे या कारवाईची सुरूवात अवैधरित्या लावण्यात आलेल्या महापौरांच्या अभिनंदनाच्या होर्डिंगवर पासून केली. यातून त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवरील राजकीय दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. जोशी यांनी शहरातील प्रमुख रस्ते, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी तीन दिवसांनी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे कुणाच्याही पोटावर पाय देणार नाही,अशी भूमिका जोशी यांनी घेतली आहे. 
नागरिकांना चांगल्या सवयी लागल्याशिवाय शहर स्वच्छ, सुंदर होणार नाही. यासाठी मनपाचे उपद्रव शोध पथक (एनडीएस) गठित करण्यात आले आहे. अस्वच्छता पसरवून शहर विद्रूप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई उपद्रव शोध पथकाद्वारे केली जाते. यामुळे  अनेक जण दुखावले आहेत. यातीलच एखाद्याने महापौर संदीप जोशी व त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्याची धमकी असलेले पत्र तक्रार पेटीत टाकले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

Web Title: So let's end the mayor with family: file a complaint with the police Sadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.