-तर नागपुरात ऑक्सिजनच्या भयावह तुटवड्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:39+5:302021-04-02T04:07:39+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी होऊ लागल्याने लवकरच भयावह स्थिती निर्माण होण्याची ...

-So the possibility of a terrible shortage of oxygen in Nagpur | -तर नागपुरात ऑक्सिजनच्या भयावह तुटवड्याची शक्यता

-तर नागपुरात ऑक्सिजनच्या भयावह तुटवड्याची शक्यता

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी होऊ लागल्याने लवकरच भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘एफडीए’च्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येनुसार रोज ११५ मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडणार आहे. पूर्ण क्षमतेने जरी ऑक्सिजन प्लांट चालविले तरी जास्तीत जास्त ११४ मॅट्रिक टन उत्पादन होऊ शकेल. मात्र, या दरम्यान रुग्ण आणखी वाढल्यास १५० मॅट्रिक टनपर्यंत मागणीत वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने व आता मृत्यू संख्येने चिंता वाढवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयात गरजेनुसार बेड नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. रुग्ण वाढल्यास ऑक्सिजनच्या तुटवड्याची शक्यता खुद्द अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) व्यक्त करीत आहे. त्यांच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात १३० मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता आहे. परंतु क्षमतेच्या ९० टक्केच उत्पादन होते. त्यानुसार ११७ मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकते. यात ८८ मॅट्रिक टन ‘एलएमओ’ तर, २९ मॅट्रिक टन एअर प्लांटमधून ऑक्सिजन मिळू शकतो. ११७ मॅट्रिक टनपैकी ८० टक्के म्हणजे ९४ मॅट्रिक टन ऑक्सिजन हा वैद्यकीय सेवेसाठी वापरला जाऊ शकतो. या शिवाय, २० मॅट्रिक टन ऑक्सिजन हा प्रॅक्स एअर, आदित्य प्रॉडक्टच्या माध्यामातून मिळू शकतो. एकूणच जवळपास ११४ मॅट्रिक टन ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा, सर्व ऑक्सिजन प्लांट २४ तास सुरू राहून ९० टक्क्यांवर ऑक्सिजनचे उत्पादन करतील. परंतु सध्याची स्थिती पाहता ११५ मॅट्रिक टनपर्यंत मागणी वाढू शकते. त्या तुलनेत केवळ ११४ मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होणार असल्याने अडचणी वाढणार आहेत.

बेड वाढल्यास ऑक्सिजनची मागणी वाढेल

कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. बहुसंख्य रुग्णालयातील ऑक्सिजनचे बेड कमी पडत आहे. रोज ३० ते ५० बेडची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार, येत्या काही दिवसांत १५० मॅट्रिक टनपर्यंत मागणीत वाढ होण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासनाने व्यक्त केली आहे. याची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिल्याचे समजते.

Web Title: -So the possibility of a terrible shortage of oxygen in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.