-तर चार वर्षांपूर्वीच पकडल्या गेला असता संदिग्ध तालिबानी आंतकवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 12:36 AM2021-06-18T00:36:37+5:302021-06-18T00:37:11+5:30

Talibani militant, crime news नागपूर पोलीस सतर्क असते तर चार वर्षांपूर्वीच संदिग्ध तालिबानी आतंकवादी नूर मोहम्मद त्याचा साथीदार मतीनसह पकडला गेला असता.

-So suspected Taliban terrorist who was captured four years ago | -तर चार वर्षांपूर्वीच पकडल्या गेला असता संदिग्ध तालिबानी आंतकवादी

-तर चार वर्षांपूर्वीच पकडल्या गेला असता संदिग्ध तालिबानी आंतकवादी

Next
ठळक मुद्देअफगाणिस्तानात पाठविण्याची तयारी : २६०० पाकिस्तानी, २६९ अन्य विदेशींची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर पोलीस सतर्क असते तर चार वर्षांपूर्वीच संदिग्ध तालिबानी आतंकवादी नूर मोहम्मद त्याचा साथीदार मतीनसह पकडला गेला असता. मतीन प्रकरणात झालेली चूक ध्यानात ठेवून पोलीस प्रशासनाने नूरला अफगाणिस्तानात पाठविण्याची तयारी चालविली आहे. पोलिसांनी विदेश मंत्रालय, अफगाणी दूतावासासोबत या संदर्भात बातचित केली आहे. नूरला लवकरात लवकर अफगाणिस्तानात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी नूरला अटक केली. तो सन २०१० पासून अवैधरीत्या राहात आहे. तो सहा महिन्याच्या टुरिस्ट व्हिसावर येथे आला होता. त्यानंतर येथे राहू लागला. तो पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेल्या मतीन नामक अफगाणी नागरिकासोबत राहात होता. त्याला वर्ष २०१७ मध्ये पकडल्याच्या प्रकरणाची नोंद आहे. त्यानंतरही तो याच ठिकाणी राहू लागला. मतीनने आधार कार्ड आणि दुसरी कागदपत्रेही तयार केली आहेत, शिवाय संपत्तीही खरेदी केली आहे. नूर अनेक वर्षांपासून मतीनसोबत जुळला आहे. वर्ष २०२७ मध्येही तो मतीनसोबतच राहात होता. त्यानंतरही पोलिसांचे नूरवर लक्ष गेले नाही. याचप्रकारे वर्ष २०१७ मध्ये मतीनला अफगाणिस्तानात पाठविण्याऐवजी प्रकरणाची नोंद करण्यात आली. नियमानुसार प्रकरणाचा निर्णय येईपर्यंत आरोपीला भारत सोडता येत नाही. याचप्रकारे मतीनला नागपुरात राहण्याची संधी मिळाली. झालेली चूक ध्यानात ठेवून पोलिसांनी प्रकरणाची नोंद करण्याऐवजी नूरला अफगाणिस्तानात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

मतीन आसाममध्ये लपल्याची शक्यता आहे. पोलीस मतीनवर नोंदविलेले प्रकरण मागे घेणे अथवा त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा विचार करीत आहे. नूर तालिबान आतंकवाद्यांमध्ये अब्दुल हक या नावाने परिचित आहे. त्याचा भाऊसुद्धा तालिबानी आतंकवाद्यांसोबत जुळला आहे. नूरची चौकशी केल्यानंतर पोलिसांना तो तालिबानी आतंकवाद्यांशी जुळल्याचा संशय आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पोलिसांनी आठवड्यापूर्वी गुप्त मोहीम सुरू केली होती. त्याअंतर्गत विदेशी नागरिकांची माहिती गोळा करण्यात येत आहे. शहरात ६९ अफगाणी नागरिक असून त्यात ३ विद्यार्थी आणि अन्य शरणार्थी आहेत. २६०० पाकिस्तानी नागरिक आहेत. ते वेगवेगळ्या कारणांनी शहरात आहेत. अन्य विदेशी नागरिकांची संख्या २६९ आहे. पोलिसांनी सर्व विदेशी नागरिकांची चौकशी सुरू केली आहे. अधिकृत विदेशी नागरिकांनाच शहरात राहू देण्यात येत आहे.

Web Title: -So suspected Taliban terrorist who was captured four years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.