-तर चार वर्षांपूर्वीच पकडला गेला असता संदिग्ध तालिबानी आंतकवादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:41+5:302021-06-18T04:07:41+5:30
- अफगाणिस्तानात पाठविण्याची तयारी : २६०० पाकिस्तानी, २६९ अन्य विदेशींची चौकशी नागपूर : नागपूर पोलीस सतर्क असते तर चार ...
- अफगाणिस्तानात पाठविण्याची तयारी : २६०० पाकिस्तानी, २६९ अन्य विदेशींची चौकशी
नागपूर : नागपूर पोलीस सतर्क असते तर चार वर्षांपूर्वीच संदिग्ध तालिबानी आतंकवादी नूर मोहम्मद त्याचा साथीदार मतीनसह पकडल्या गेला असता. मतीन प्रकरणात झालेली चूक ध्यानात ठेवून पोलीस प्रशासनाने नूरला अफगाणिस्तानात पाठविण्याची तयारी चालविली आहे. पोलिसांनी विदेशी मंत्रालय, अफगाणी दूतावातासह या संदर्भात बातचित केली आहे. नूरला लवकरात लवकर अफगाणिस्तानात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी बुधवारी दुपारी नूरला अटक केली. तो सन २०१० पासून नागपुरात अवैधरीत्या राहात आहे. सहा महिन्याच्या टुरिस्ट व्हिसावर तो आला होता. त्यानंतर येथेच राहू लागला. पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेल्या मतीन नामक अफगानी नागरिकासोबत राहात होता. मतीनला वर्ष २०२७ मध्ये पकडल्याच्या प्रकरणाची नोंद आहे. त्यानंतरही तो याच ठिकाणी राहू लागला. मतीनने आधार कार्ड आणि दुसरे कागदपत्रेही तयार केली आहेत, शिवाय संपत्तीही खरेदी केली आहे. नूर अनेक वर्षांपासून मतीनसोबत जुळला आहे. वर्ष २०१७ मध्येही तो मतीनसोबतच राहात होता. त्यानंतरही पोलिसांचे नूरवर लक्ष गेले नाही. याचप्रकारे वर्ष २०१७ मध्ये मतीनला अफगाणिस्तानात पाठविण्याऐवजी प्रकरणाची नोंद करण्यात आली. नियमानुसार प्रकरणाचा निर्णय येईपर्यंत आरोपीला भारत सोडता येत नाही. याचप्रकारे मतीनला नागपुरात राहण्याची संधी मिळाली. झालेली चूक ध्यानात ठेवून पोलिसांनी प्रकरणाची नोंद करण्याऐवजी नूरला अफगानिस्तानात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
मतीन आसामध्ये लपल्याची शक्यता आहे. पोलीस मतीनवर नोंदविलेले प्रकरण मागे घेणे अथवा त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा विचार करीत आहे. नूर तालिबान आतंकवाद्यांमध्ये अब्दुल हक या नावाने परिचित आहे. त्याचा भाऊसुद्धा तालिबानी आतंकवाद्यांशी जुळला आहे. नूरची चौकशी केल्यानंतर पोलिसांना तो तालिबानी आतंकवाद्यांशी जुळल्याचा संशय आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पोलिसांनी आठवड्यापूर्वी गुप्त मोहीम सुरू केली होती. त्याअंतर्गत विदेशी नागरिकांची माहिती गोळा करण्यात येत आहे. शहरात ६९ अफगाणी नागरिक असून त्यात ३ विद्यार्थी आणि अन्य शरणार्थी आहेत. २६०० पाकिस्तानी नागरिक आहेत. ते वेगवेगळ्या कारणांनी शहरात आहेत. अन्य विदेशी नागरिकांची संख्या २६९ आहे. पोलिसांनी सर्व विदेशी नागरिकांची चौकशी सुरू केली आहे. अधिकृत विदेशी नागरिकांनाच शहरात राहू देण्यात येत आहे.