...तर दळणही दहा रूपयाने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध
By आनंद डेकाटे | Published: March 3, 2023 04:21 PM2023-03-03T16:21:50+5:302023-03-03T16:25:56+5:30
ई-जनसुनावणी
नागपूर :महावितरणची प्रस्तावित वीज दरवाढ लागू झाली तर त्याचा थेट परिणाम गृहकुटीर उद्योगावर होईल. साधे पीठाचे दळण हे एका किलोमागे दहा रूपयाने महाग होईल. त्यामुळे प्रत्येक घरातील बजेटवर याचा थेट परिणाम होईल, असे वीज नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांनी स्पष्ट करीत महावितरणच्या प्रस्तावित वीजदरवाढीला तीव्र विरोध नोंदवला.
महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दरवाढीची मागणी करीत याचिका दाखल केली. यात २०२३-२४ सोबतच २०२४-२५ साठीसुद्धा दरवाढ प्रस्तावित आहे. यावर आयोग निर्णय घेण्याअगोदर विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी घेत आहे. या अंतर्गत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपासून वनामती सभागृहात ई-जनसुनावणीला सुरुवात झाली.
आयोगाने व्हिडिओ कान्फ्ररन्सिंगच्या माध्यमातून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनसह अनेक उद्योग संघटना व नागरिकांनी यादरम्यान आपले आक्षेप नोंदवले.