"...म्हणून यंदा हिंदुस्थान जगात पहिल्या क्रमांचा ऊस उत्पादक देश ठरलाय"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 08:44 PM2023-04-01T20:44:25+5:302023-04-01T20:48:37+5:30

माहिती माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. 

"...so this year India has become the first sugarcane producing country in the world", Says Sharad pawar in nagpur | "...म्हणून यंदा हिंदुस्थान जगात पहिल्या क्रमांचा ऊस उत्पादक देश ठरलाय"

"...म्हणून यंदा हिंदुस्थान जगात पहिल्या क्रमांचा ऊस उत्पादक देश ठरलाय"

googlenewsNext

नागपूर - जगामध्ये ब्राझील हा देश ऊसाच्या उद्योगात पहिल्या क्रमांकावर आहे. ब्राझीलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. यंदा ब्राझीलमध्ये दुष्काळाची स्थिती झाली असल्याने तिथे ऊसाचे उत्पादन घटले, परिणामतः हिंदुस्थान जगात पहिल्या क्रमांकावर गेला आहे, अशी माहिती माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नागपूर येथील गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणच्या नवीन जागेची संस्थेतील सहकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी दौरा केला. यावेळी, आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भात ऊसाच्या उद्योगाला चालना देण्यासाठीचा हा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी होईल, असा दृढ विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, आज एका ऊसाच्या पीकापासून साखर, इथेनॉल, वीज तयार होऊ शकते. पीकाला अधिकची किंमत मिळाल्यानंतर त्या भागात काही नव्या गोष्टी उभ्या राहू शकतात. हे काम करण्यात देशपातळीवर महाराष्ट्र पुढे आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग दिवसेंदिवस या क्षेत्रात प्रगती करत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. पण या कामाला अधिक गती देण्यासाठी, आम्हा लोकांच्या मनात फार दिवसांपासून असलेला विचार कृतीत रुजवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांचे सहकारी आहेत. त्यांची मनापासूनची इच्छा आहे की विदर्भात साखर कारखानदारी यशस्वी झाली पाहिजे. याचा अर्थ असा की, या सर्व परिसरात आपण सामूहिक प्रयत्न केले तर विदर्भ ऊस उद्योग क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा परिसर होईल यात शंका नाही. त्यादृष्टीने इथे काम करायचे आहे, असे म्हणत शरद पवार यांनी गडकरींचं कौतुकही केलंय. 

ऊस पीक आणि विदर्भ यावर पवारांचं भाष्य

ऊस उद्योगात काम करण्यासाठी जमीन आणि पाण्याची गरज आहे. या दोन्ही गोष्टी इथे उपलब्ध आहेत. यात यश मिळण्यासाठी जो ऊस लावायचा ते बेणं उत्तम दर्जाचे असलं पाहिजे. हे पीक कसे घ्यायचे यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. ही सुविधा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पुरवली जाईल. माझी खात्री आहे ऊसाच्या क्षेत्रात हा भाग अतिशय महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. याठिकाणाहून नागपूर शहर जवळ आहे व इथे इन्स्टिट्यूट उभारली तर इथे बियाणे, प्रशिक्षण सेंटर उभारून नव्या पिढीला प्रशिक्षित करण्याची व्यवस्था करू शकतो. कालांतराने याठिकाणी ऊसाचे पीक उभे असेल याची खात्री आहे.

ऊस हे दोन पैसे अधिकचे देणारे पीक आहे. त्यामुळे नवी पिढी याकडे लक्ष देईल असा विश्वास वाटतो. या भागातील शेतकरी सोयाबीन आणि कापूस या पीकात अडकला आहे. मात्र ऊस आणि सोयाबीन हे समीकरण चांगले आहे. ही दोन्ही पीकं शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतील.

हा कार्यक्रम याठिकाणी घेऊन यशस्वी करूनच दाखवायचा हा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे. त्याला तुम्हा सर्वांची साथ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. ऊस उत्पादन झाल्यावर त्यापासून जे घटक निर्माण होतात त्याची चाचणी करावी लागते. त्यासाठी एका प्रयोगशाळेची गरज आहे. त्या प्रयोगशाळेची सुरुवात या नागपूरच्या केंद्रावर आतापासूनच करण्याची तयारी आहे. या प्रयोगशाळेचा फायदा छोट्या मोठ्या उद्योगांना निश्चितपणे होईल. हे सेंटर नागपूर येथील बुटीबोरी येथे सुरु करण्यात येईल. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

Web Title: "...so this year India has become the first sugarcane producing country in the world", Says Sharad pawar in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.