..तर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:08 AM2021-03-18T04:08:24+5:302021-03-18T04:08:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संक्रमण रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, राजकीय व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संक्रमण रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंध लावले आहेत. परंतु नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने नागपूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा दररोज आढावा घेतला जात आहे. गरज भासल्यास प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी दिला.
मृत्यूला आळा घालण्यासाठी बाधितांना वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. याचा विचार करता संक्रमणाला रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या दुप्पट वाढविण्यात आली आहे. शहरात ११०० बेड उपलब्ध आहेत. शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थिती, परिवहन सेवा ५० टक्के क्षमतेने चालविली जात आहे. खासगी कार्यालयातील उपस्थितीला निर्बंध घालण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
...
घराबाहेर फिरणाऱ्या बाधिताला दंड
बाबा बुद्धाजीनगर येथील गृहविलगीकरणमध्ये राहणे आवश्यक असतानाही कोरोनाबाधित रुग्ण घराच्या बाहेर फिरताना आढळल्यामुळे मनपाच्या पथकाने त्याच्याकडून पाच हजाराचा दंड वसूल केला. गृहविलगीकरणात असलेल्यांकडून नियमाचे पालन होत नसल्याने संक्रमणाचा धोका वाढला आहे.