- तर पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:50+5:302021-03-05T04:08:50+5:30
सावनेर : मार्चच्या पहिल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यातील पारा ३७ अंशावर पोहोचला आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार असा हवामान खात्याचा ...
सावनेर : मार्चच्या पहिल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यातील पारा ३७ अंशावर पोहोचला आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार असा हवामान खात्याचा अंदाजही आहे. त्यामुळे एप्रिल आणि मेमध्ये नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आतापासून पाण्याचे योग्य नियोजन होणे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाटबंधारे उपविभाग, सावनेरअंतर्गत एकूण १३ प्रकल्प आहेत. यापैकी तब्बल आठ प्रकल्पातील पाण्याचा साठा ५० टक्क्याहून कमी आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पातील पाण्याच्या साठ्याची अशी बिकट अवस्था असल्याने यंदा उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी आणि जनतेला पाणी समस्येला पुढे जावे लागण्याची शक्यता आहे.
४ मार्च रोजीची तालुक्यातील प्रकल्पनिहाय पाणीसाठ्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे: केसरनाला- ६१.८३ टक्के, उमरी (४७.७२ टक्के), कोलार (५४.०२ टक्के), खेकरानाला (६८.१९ टक्के), माहूरकुंड (३९.८७ टक्के), नागलवाडी (६२.६९ टक्के), कान्हादेवी (२९.९७ टक्के), सुवरधरा (३५.२४ टक्के), भागेमाहरी (४६.८३ टक्के), रायबासा (४३.१३ टक्के), खुमारीनाला (६५.२५ टक्के), नांदा (१५.१० टक्के), भागेमाहरी के.टी. (४२.१७ टक्के) इतका आहे. तालुक्यातील सर्वाधिक पाण्याचा साठा खेकरानाला प्रकल्पात (६८.१९ टक्के) तर कमी साठा नांदा प्रकल्पात अवघा (१५.१० टक्के) इतका आहे.