- तर होणार नाही का संक्रमण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:43+5:302021-03-05T04:08:43+5:30
मौदा : नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. विनामास्क वावरणाऱ्या ...
मौदा : नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. विनामास्क वावरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र मौदा येथील तहसील कार्यालयात मास्क आणि सॅनिटाझरविना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात संक्रमणाचा धोका वाढला आहे.
तहसील कार्यालयात येताना नागरिकांनी प्रवेशद्वारावरील मशीनवर हात सॅनिटाईझ करूनच आत प्रवेश करावा, असे आदेश काढले होते. त्यानुसार तोंडावर मास्क आणि हात सॅनिटाईझ करूनच प्रवेश देण्यात आला. येथे एनटीपीसीच्या वतीने मशीन बसविण्यात आली होती. काही दिवस ही मशीन सुरू राहिली. पण आता ही मशीन बंद पडल्याने नागरिक हात सॅनिटाईझ न करता आत प्रवेश करीत आहेत. यावर तहसील प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.