लोकमतची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:19+5:302020-12-15T04:25:19+5:30

१९८४ साली मराठवाड्यात झालेल्या अभूतपूर्व पुराने अनेक गावांचे नुकसान झाले. जनतेच्या सहकार्यातून पूरग्रस्त भागात शाळा बांधून देण्यात आल्या. १९८८ ...

The social commitment of the people | लोकमतची सामाजिक बांधिलकी

लोकमतची सामाजिक बांधिलकी

Next

१९८४ साली मराठवाड्यात झालेल्या अभूतपूर्व पुराने अनेक गावांचे नुकसान झाले. जनतेच्या सहकार्यातून पूरग्रस्त भागात शाळा बांधून देण्यात आल्या.

१९८८ साली बिहारमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी लोकमतने रु. १८ लाख गोळा करून तो निधी मदतकार्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्वाधीन केला.

१९९१ साली नागपूर जिल्ह्यातील पुरामुळे मोवाड व जलालखेडा येथे अपरिमित नुकसान झाले. तेव्हा लोकमतने पूरग्रस्त निधी उभारून मोवाड येथे इस्पितळ आणि जलालखेडा येथे शाळा बांधून दिली.

१९९३ साली अनंत चतुर्दशीच्या दिवशी मराठवाड्यात किल्लारी येथे भूकंपाने हाहाकार माजवला होता. तेव्हा लोकमतने भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारून २० लाख रुपये गोळा केले होते. या निधीतून भूकंपग्रस्त भागात दोन शाळा व एक समाजमंदिर बांधण्यात आले.

१९९९ साली झालेल्या कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या मदतीसाठी कारगील सहायता निधी उभारण्यात आला. त्यातून महाराष्ट्रातील शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली, तसेच जवानांच्या मुलांसाठी नागपूर, औरंगाबाद व सोलापूर येथे वसतिगृहे बांधण्यात आली.

२६ जानेवारी २००१ साली, गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा लोकमतने भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारून भूकंपग्रस्त भागात २५० शाळा उभारल्या.

अशा तऱ्हेने लोकमतने केवळ वृत्तसंकलनाचे काम न करता समाजात बंधुभाव व एकात्मता रुजविण्यासाठी विविध उपक्रम घेऊन समाजाशी आपले आगळेवेगळे नाते प्रस्थापित केले आहे. लोकमत हे केवळ वृत्तपत्र नसून ती चळवळ आहे, याचा प्रत्यय आपल्या अनेक उपक्रमांद्वारे लोकमतने आणून दिला आहे.

Web Title: The social commitment of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.