एका दुर्दैवी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

By admin | Published: February 25, 2016 03:04 AM2016-02-25T03:04:43+5:302016-02-25T03:04:43+5:30

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगर येथील एका दुर्दैवी कुटुंबावरील सामाजिक बहिष्काराचे एक प्रकरण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात दाखल झाले.

Social exclusion on an unfortunate family | एका दुर्दैवी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

एका दुर्दैवी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

Next

जेएमएफसी न्यायालयात न्यायाची याचना : चौकशीचे आदेश
नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगर येथील एका दुर्दैवी कुटुंबावरील सामाजिक बहिष्काराचे एक प्रकरण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात दाखल झाले. १० मार्चपर्यंत तक्रारकर्त्याचे बयान नोंदवण्यात यावे, गुन्हा होत असेल तर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने पाचपावली पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला दिले आहे.
अवतारसिंग सिमरतसिंग मारवाह यांनी फौजदारी व्यवहार संहितेच्या कलम २०० अंतर्गत ही फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत बुद्धनगर येथील गुरुद्वारा श्री कलगीधर दरबारचे अध्यक्ष एस. मलकियतसिंग सग्गू, बाबा बुधाजीनगर येथील गुरुद्वारा गुरू तेग बहादूर साहिबचे अध्यक्ष निशानसिंग घोत्रा यांच्यासह ११ गुरुद्वारांच्या अध्यक्षांना आरोपी केले आहे.
या सर्व अध्यक्षांनी ६ आॅगस्ट २०१४ रोजी फतवा काढून आम्हाला समाजातून बहिष्कृत केले. आमच्या कुटुंबाशी कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणार नाही, कोणतेही नाते ठेवणार नाही, अशा आशयाचा हा फतवा आहे. तब्बल १४ वर्षे गुरुद्वाराचे अध्यक्ष म्हणून राहिलेले कामठी रोड काश्मिरी गल्ली येथील जयसिंग बावासिंग पुन्नी यांनाही कुटुंबासह समाजातून बहिष्कृत करण्यात आलेले आहे. जयसिंग पुन्नी यांनी अवतारसिंग मारवाह यांना मदत केली म्हणून त्यांना बहिष्कृत करण्यात आले. मारवाह यांनी आपल्या विधवा वहिनीला वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सेवाटणीचे १५ लाख रुपये दिले नाही, असा आरोप करून त्यांच्यावर हा बहिष्कार घालण्यात आला. आपला भाऊ हयात असताना त्याला आपण हिस्सा देऊन चुकलो, अशी बाजू मारवाह यांनी गुरुद्वाराच्या कमिटीपुढे मांडली होती. आपली बाजू नीट ऐकून न घेता आपणावर अन्यायपूर्ण बहिष्कार घालण्यात आला. आपले व जयसिंग पुन्नी यांचे छायाचित्र असलेला हा सामाजिक बहिष्काराचा फतवा सर्व गुरुद्वारांच्या दारांवर लावण्यात आला आणि बदनामी करण्यात आली, असा उल्लेख अवतारसिंग मारवाह यांनी आपल्या तक्रारीत करून आरोपींविरुद्ध भादंविच्या ४६९, ४०४, ५०५, ३४ कलमांतर्गत खटला चालवून शिक्षा करण्यात यावी, अशी प्रार्थना अवतारसिंग यांनी तक्रारीत केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Social exclusion on an unfortunate family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.