‘समाजस्वास्थ्य’ म्हणजे नैतिक मूल्यांचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:18 AM2017-09-17T01:18:05+5:302017-09-17T01:18:21+5:30

‘जुनाट रूढी, चालीरीती, परंपरांचं दुकान भावनांच्या आधारे चालते. तिथं बुद्धीचा वापर करणाºयांना प्रवेश नाही. अशाच लोकांची सत्ता असेल तर ज्याची सत्ता त्याचा न्याय हा नियम असतो’, रघुनाथ धोंडो कर्वे ....

'Social health' is the view of moral values | ‘समाजस्वास्थ्य’ म्हणजे नैतिक मूल्यांचा विचार

‘समाजस्वास्थ्य’ म्हणजे नैतिक मूल्यांचा विचार

Next
ठळक मुद्देजुनाट विचारांवर प्रहार : नाटकघर पुणे यांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘जुनाट रूढी, चालीरीती, परंपरांचं दुकान भावनांच्या आधारे चालते. तिथं बुद्धीचा वापर करणाºयांना प्रवेश नाही. अशाच लोकांची सत्ता असेल तर ज्याची सत्ता त्याचा न्याय हा नियम असतो’, रघुनाथ धोंडो कर्वे यांची भूमिका करणाºया अतुल पेठे यांच्या या संवादाने आज जोरदार टाळ्या घेतल्या. निमित्त होते अतुल पेठे दिग्दर्शित व ज्येष्ठ नाटककार प्रा. अजित दळवी लिखित ‘समाजस्वास्थ्य’च्या प्रयोगाचे. शनिवारी संध्याकाळी शंकरनगरातील साई सभागृहात सादर झालेल्या या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांना नैतिक मूल्यांचा विचार करायला अंतर्मुख केले.
नाटकाचा विचार संवेदनशील पण सडेतोड होता. स्त्री-पुरुष संबंध, व्यभिचार या विषयावर लिहिणारे, संततीनियमनाचा प्रचार आणि प्रसार करणारे रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लीलतेचा आरोप ठेवून चालविण्यात येणारे तीन खटले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे मातब्बर वकील दिमतीला असूनही हरलेला त्यातील एक खटला, तिसºया खटल्यात तांत्रिक मुद्यांवर ते सुटत असले तरी चौथा खटल्याला त्यांना सामोरे जावे लागते. पण त्यांचा संघर्ष थांबलेला असतो. परंपरागत बुरसटलेले विचार मात्र कायम जिवंतच असतात.
पुराणातील आणि आख्यायिका ठरलेल्या व्यक्तींबद्दल बोलायचे नाही, असा निर्बंध असलेल्या अशा काळात अत्यंत निर्भय विचारांचा रघुनाथ धोंडो कर्वे किल्ला लढवितात. रसिकांशी थेट संवाद साधणाºया आणि काळजाला भिडणाºया नाटकाचा पडदा पडल्यानंतरही मनात एक ठिणगी पेटवून जातात.
अतुल पेठे यांच्या दिग्दर्शनाची शैली व भूमिका एकदम भिन्न असल्यामुळे नाटक लक्षवेधी ठरते. त्यांना राजश्री सावंत-वाड यांची मालतीबार्इंच्या भूमिकेत तितकीच तोलामोलाची साथ मिळाली.
‘समाजस्वास्थ’ या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत नरेंद्र भिडे, प्रकाशयोजना प्रदीप वैद्य, वेशभूषा माधुरी पुरंदरे, रंगभूषा आशिष देशपांडे, ध्वनिआरेखन अमर देवगावकर यांचे होते. कलाकार अजित साबळे, अभय जबडे, रणजित मोहिते, करण कांबळे, धनंजय सरदेशपांडे, संतोष माळी, आशिष वझे, नीरज पांचाळ, अनिकेत दलाल, ओंकार शिंदे, राजस कोठावळ, अनुप सातपुते, प्रशांत कांबळे, कृतार्थ शेवगावकर, रेखा ठाकूर या सर्वांनी आपल्या भूमिका उत्तम केल्या आहेत.

Web Title: 'Social health' is the view of moral values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.