सोशल व्हायरल; इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेतून दीक्षाभूमी गायब

By आनंद डेकाटे | Published: January 2, 2023 09:17 PM2023-01-02T21:17:40+5:302023-01-02T21:21:24+5:30

Nagpur News नागपुरात ३ ते ७ जानेवारीदरम्यान होत असलेल्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या निमंत्रणपत्रिकेत आयोजकांना दीक्षाभूमीचा विसर पडल्याचा एक मेसेज सोशल मिडियावर फिरतो आहे.

Social Viral; Dikshabhumi is missing from the Indian Science Congress invitation card | सोशल व्हायरल; इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेतून दीक्षाभूमी गायब

सोशल व्हायरल; इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेतून दीक्षाभूमी गायब

Next
ठळक मुद्दे सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे नाराजी

नागपूर : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तब्बल ४८ वर्षांनंतर इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद लाभले आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान नागपुरात विज्ञानाचा उत्सव होणार आहे. यासाठी भव्यदिव्य तयारीही करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सुंदर अशी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. सध्या ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असली तरी ती पाहिल्यावर विद्यापीठावर टीका होत आहे.

या निमंत्रण पत्रिकेत नागपुरातील अनेक ऐतिहासिक व महत्त्वाच्या स्थळांना स्थान देण्यात आले आहे. मात्र त्यात देशातच नव्हे तर जगात ओळख असलेल्या दीक्षाभूमीला मात्र स्थान देण्यात आले नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मदीक्षा घडवून आणली ती दीक्षाभूमी आज बौद्ध धम्माचे जागतिक प्रतीक ठरले आहे. बौद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म म्हणून ओळखला जातो. त्याच धम्माचे प्रतीक असलेल्या दीक्षाभूमीचा विसर राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाला पडल्याची खंत व्यक्त करीत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Social Viral; Dikshabhumi is missing from the Indian Science Congress invitation card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.