समाजकार्य अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:30+5:302021-07-14T04:09:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे पुणे ...

Social work courses will be more employment oriented | समाजकार्य अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख करणार

समाजकार्य अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे पुणे येथील समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. याबाबत नुकतीच त्यांनी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची बैठक घेतली. समाज, सरकार, उद्योग, कर्मचारी आणि प्रकल्पामुळे होणाऱ्या बाधितांसाठी दुवा म्हणून समाजकार्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. नारनवरे यांनी कळवले आहे.

राज्यात एकूण ५४ समाजकार्य महाविद्यालये आहेत. सामाजिक कार्य करणारी पिढी तयार होण्यासाठी या महाविद्यालयाची स्थापना झालेली असते. मात्र, बदलत्या काळात तो उद्देश बाजूला राहिला. नुसती पदवी मिळाली म्हणून काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. शासन आणि समाज संस्था यांच्यातील दुवा अशी व्यापक संकल्पना आणि त्यानुषंगाने मोठी संधी असतानाही महाविद्यालयांमधून अशा प्रकारचे शिक्षण प्रभावी ठरत नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्या बदलानुसार अभ्यासक्रमाची रचना होत आहे. यामध्ये विद्यार्थी एखाद्या उद्योगाबरोबर मोठ्या प्रकल्पाबरोबर जोडून देण्यात येतील.

कामगार, प्रकल्पबाधित यांच्याशी उद्योगांच्या, सरकारच्यावतीने संवाद साधणे, त्यांच्यासाठी नव्या योजना तयार करणे, असे काम अनुभव म्हणून विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येईल. याशिवाय वंचित, उपेक्षित लोकसमुहाशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारसमोर आणणे, कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व फंडाचा (सीएसआर) वापर विधायक कामासाठी करणे, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागास अत्यंत महत्त्वाची माहिती संशोधनाच्या माध्यमातून या महाविद्यालयांच्यामार्फत जमा करण्यात येणार आहे. त्यातून विभागाच्या योजनांमध्ये करावयाच्या बदलांसाठी माहिती उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Social work courses will be more employment oriented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.