स्त्रीला कमी लेखणारा समाज सुसंस्कृत नसतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:01 PM2019-05-30T12:01:16+5:302019-05-30T12:01:52+5:30
हजारो वर्षांच्या अन्यायासाठी स्त्रियांची माफी मागावी लागेल, कारण स्त्रीला कमी लेखणारा समाज सुसंस्कृत नसतो, असे मनोगत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगाचा इतिहास हा वंचितांच्या शोषणाचा इतिहास आहे आणि या वंचितांमध्ये स्त्री ही सर्वाधिक वंचित घटक होय. मानवी संस्कृतीच्या इतिहासात आतापर्यंत कधी बाहेरच्यांकडून तर कधी सगेसंबंधकाकडून अन्यायच झाला आहे. स्त्रीला आपण देवतेच्या स्थानी बसविले, मूतर््ीांची पूजा केली, पण आपल्या जवळच्या स्त्रियांचा सन्मान केला नाही.
या गोष्टीचा अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल आणि हजारो वर्षांच्या अन्यायासाठी स्त्रियांची माफी मागावी लागेल, कारण स्त्रीला कमी लेखणारा समाज सुसंस्कृत नसतो, असे मनोगत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
लेखिका, मासिकाच्या संपादक, प्रकाशक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त त्यांचा भावनिक सत्कार बुधवारी शंकरनगर येथील बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आला. याप्रसंगी गिरीश गांधी, डॉ. श्रीकांत तिडके, लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ. वंदना महात्मे, डॉ. प्रकाश खरात प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. अश्विनी धोंगडे व अरुणा सबाने यांनी संपादित केलेल्या ‘स्त्री : एक बहुरूपदर्शन’ या स्त्रीवादी ग्रंथाचे व ‘दुर्दम्य’ या अरुणा सबाने यांच्या गौरवग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.
सुरेश द्वादशीवार पुढे म्हणाले, स्त्रियांवर नेहमी राज्य, कायदा, धर्म, संस्कृती, परंपरांची बंधने लादून अन्याय झाला. बंदिस्त राहिलेल्या स्त्रियांनीही सरकार, धर्मगुरू किंवा जातीच्या पुढाऱ्यांच्या भीतीपोटी आवाज उठविला नाही. स्त्रिया जर बोलू लागल्या, व्यथा मांडू लागल्या तर समाजाचे बुरखे फाटल्याशिवाय राहणार नाही.
पण व्यथा मांडण्याचे कुणी धाडस करीत नाही. अशा परिस्थितीत अरुणा सबाने यांनी स्वत:वर होणाºया टीकेला भीक न घालता खंबीरपणे स्त्रियांवर होणाºया अत्याचाराविरोधात आवाज उठविला आणि पीडितांना बळ दिले. त्यामुळे अरुणाचा सत्कार समाजाला अंतर्मुख करणारा आहे, असे गौरवोद््गार त्यांनी काढले.
डॉ. श्रीकांत तिडके म्हणाले, जल, जंगल व जमीन वाचविण्यात, शेती फुलविण्यात आणि सृजनशील काही घडविण्यात स्त्रीचा वाटा मोलाचा आहे. अरुणा सबाने याही अशाच सृजनशील स्त्रीवादी परंपरेतील आहेत. अरुणा या संविधानाने दिलेले फळ आहेत आणि त्यांच्या कार्याने देशाची लोकशाही बळकट राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. अश्विनी धोंगडे यांनीही सबाने यांच्या समवेतील मैत्रीला उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना अरुणा सबाने यांनी, आयुष्यात घडलेल्या अपघातामुळे आयुष्याला नवी दिशा मिळाल्याचे व भीती दूर होऊन यशस्वी होता आल्याची भावना व्यक्त केली. स्त्रियांना व्यक्त होऊ द्या, त्यांच्या गुणांना चालना द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गिरीश गांधी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी केले तर संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.