सॉफ्टवेअरमध्ये बिघाड : एअर इंडियाच्या विमानांना सात तासापर्यंत उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:29 PM2019-04-27T23:29:12+5:302019-04-27T23:29:50+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. एअरलाईन्सची विमाने चार ते सात तास उशिरा पोहोचली. चेक इन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. अनेक प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. एअरलाईन्सची विमाने चार ते सात तास उशिरा पोहोचली. चेक इन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. अनेक प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-६२७ मुंबई-नागपूर विमान शनिवारी सकाळी ७.१५ ऐवजी ४.२० तास उशिराने पोहोचले. एआय-४६९ दिल्ली-नागपूर सकाळी ७.४० ऐवजी सहा तास उशिरा दुपारी २.३० वाजता आले. तर एआय-६२९ मुंबई-नागपूर शनिवारी सायंकाळी निर्धारित वेळेऐवजी रात्री २ वाजता येण्याची शक्यता आहे. नागपूर विमानतळावर आठ महिन्यांपूर्वी चेक इन आणि बोर्डिंग पासकरिता प्रवाशांना लांब रांगेपासून दिलासा देण्यासाठी क्यूट सिस्टीम शुल्कासह सुरू केली होती. ही सिस्टीम ‘सीता’ सॉफ्टवेअरच्या मदतीने संचालित करण्यात येते.
इंडिगोचे एक विमान लेट
इंडिगो एअरलाईन्सचे ६ई२८४ पुणे-नागपूर विमान एक तास १२ मिनिटे विलंबासह शुक्रवारी रात्री ३.२२ वाजता पोहोचले.