मातीचा गणपती बनवु या

By admin | Published: August 1, 2014 01:14 AM2014-08-01T01:14:45+5:302014-08-01T01:14:45+5:30

लोकमत कॅम्पस क्लब (बालविकास मंच), युवा नेक्स्ट व सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने मातीचे गणपती बनविण्याची व विविध कलाकृतींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यशाळेची

The soil of Lord Ganesha | मातीचा गणपती बनवु या

मातीचा गणपती बनवु या

Next

विविध कलाकृतींची कार्यशाळा : लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व सखी मंचचा संयुक्त उपक्रम
नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब (बालविकास मंच), युवा नेक्स्ट व सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने मातीचे गणपती बनविण्याची व विविध कलाकृतींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यशाळेची तारीख आणि वेळ वेगवेगळी आहे. यामुळे तीनही मंचच्या सदस्यांसोबतच इतरांनाही या दोन्ही कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे.
जल प्रदूषण दूर करू या... मातीचे गणपती बसवू या... चला गणेश बनवू या... या शीर्षकांतर्गत मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा ८ ते १३ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. वेळ दुपारी २.३० ते ५.३० वाजताची असणार आहे. सदस्यांकरिता प्रवेश शुल्क ३०० तर इतरांसाठी ५०० रुपये आकारण्यात येईल.
विविध कलाकृतींची कार्यशाळा ६ आॅगस्टपासून सुरू होईल. पाच दिवसीय असलेली ही कार्यशाळा सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत ११ वा मजला, बी -विंग, लोकमत भवन रामदासपेठ येथे आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेत ‘क्ले’मध्ये स्कल्पचर, बेसिक ते पेंटिंग रंग कोणते व कसे वापरावे. अ‍ॅम्बॉस, म्युरल किंवा मास्क-राजस्थानी मास्क, ड्रामा मास्क, डिझाईन कटआऊट पद्धत, घसाई पद्धत, फिनिशिंग पद्धत, रंग कोणते वापरावेत व वापरण्याची पद्धत, पॉट मेकिंग (आधुनिक पद्धत), साखळी वर्क, स्ट्रोक वर्क, अलादिन चिराग, कार्टुन मास्क, ड्रामा मास्क तसेच हडप्पाकालीन शस्त्रे व आभूषणे आदी शिकविले जातील. कार्यशाळेचे शुल्क सदस्यांकरिता ३०० तर इतरांकरिता ५०० रुपये ठेवण्यात आले आहे. या दोन्ही कार्यशाळेत सदस्यांसोबतच इतरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता इव्हेंटस् कार्यालय, लोकमत भवन, जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ येथे किंवा २४९३५५ किंवा ९८२२४०६५६२ किंवा ९९२२९१५०३५ किंवा ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: The soil of Lord Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.