सोलर ग्रुपला खंडणीसाठी आला ‘ई-मेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2023 10:33 PM2023-02-02T22:33:31+5:302023-02-02T22:34:55+5:30

Nagpur News देशातील आघाडीची स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या सोलर ग्रुपवर ‘सायबर’ हल्ला झाल्याने सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार झाल्यावर ‘हॅकर्स’ने ‘मार्केट’मध्ये संबंधित ‘डेटा’साठी ‘बिड’ केली.

Solar Group received 'e-mail' for extortion | सोलर ग्रुपला खंडणीसाठी आला ‘ई-मेल’

सोलर ग्रुपला खंडणीसाठी आला ‘ई-मेल’

googlenewsNext
ठळक मुद्दे‘हॅकर्स’कडून मार्केटमध्ये ‘बिड’सुरक्षा यंत्रणांकडून युद्धपातळीवर तपास सुरू

नागपूर : देशातील आघाडीची स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या सोलर ग्रुपवर ‘सायबर’ हल्ला झाल्याने सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार झाल्यावर ‘हॅकर्स’ने ‘मार्केट’मध्ये संबंधित ‘डेटा’साठी ‘बिड’ केली. तसेच सोलर ग्रुपला खंडणीसाठी ‘ई-मेल’ आला होता. मात्र आणखी धोका नको म्हणून त्या मेलला ‘क्लिक’ करण्याचेदेखील टाळण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी नागपुरात पोहोचले आहेत.

सोलर ग्रुपवर मागील आठवड्यात हा सायबर हल्ला झाला. हॅकर्सने त्यात कंपनीचा महत्त्वाचा डेटा चोरला. त्यात कंपनीच्या माहितीसह संरक्षणविषयक माहिती आणि ड्रॉइंग्जचा समावेश होता. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना सूचना दिली व तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल याचा तपास सुरू केला आहे. ब्लॅक कॅट नावाच्या हॅकर्स ग्रुपकडून हा हल्ला करण्यात आला आहे. २ टीबीपेक्षा जास्त डेटा चोरी गेला आहे. सोलरच्या तज्ज्ञांनी यातील काही डेटा परत मिळविण्यात यश मिळविले आहे.

डाटा परत हवा तर लिंकवर क्लिक करा

यासंदर्भात सोलर ग्रुपकडून कुठलीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. हा हल्ला झाल्यावर कंपनीला तीन ई मेल आले. त्यात काही लिंक होत्या. चोरी केलेला डाटा परत हवा असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर कोणत्या स्वरुपात तडजोड करू याबाबत सांगण्यात येणार असल्याचे हॅकर्सने त्यात नमूद केले. मात्र त्यावर ‘क्लिक’ करण्यात आले नाही.

चोरलेल्या डेटाचे स्क्रीनशॉट्स केले अपलोड

यासंदर्भात तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या विविध संकेतस्थळांवर आठवड्याभराअगोदरच माहिती अपलोड झाली होती. यात सोलर ग्रुपवर नेमका कसा हल्ला झाला, त्यात कोणत्या डेटाची चोरी झाली याची सविस्तर माहिती आहे. हॅकर्सने डेटा विकण्यासाठी मार्केटमध्ये बिड केली. लोकांचा विश्वास पटावा यासाठी त्यांनी लिक केलेल्या कागदपत्रांचे काही स्क्रीनशॉट्सदेखील अपलोड केली.

चोरी गेलेल्या डेटात आहे तरी काय ?

चोरी गेलेल्या डेटामध्ये नेमकी किती संवेदनशील माहिती होती याची माहिती अद्याप सोलर ग्रुपकडून देण्यात आलेली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात कंपनीचे अधिकारी-कर्मचारी व ग्राहकांची विस्तृत माहिती, शस्त्रास्त्रांचे ब्लुप्रिंट्स, कंपनीच्या उत्पादनांचे दस्तावेज, प्रोडक्ट टेस्टिंगची दस्तावेज, भविष्यातील उत्पादनांची माहिती, सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग्ज, बॅकअप्स इत्यादींचा समावेश होता.

Web Title: Solar Group received 'e-mail' for extortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.