आत्मनिर्भर स्टेशन... नागपुरजवळील बुटीबोरी रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित
By नरेश डोंगरे | Published: July 25, 2023 02:19 PM2023-07-25T14:19:31+5:302023-07-25T14:19:57+5:30
या पार्श्वभूमीवर, सोमवारी २४ जुलैला बुटीबोरी रेल्वे स्थानकावर १५ किलो वॅट पावरचे सौर ऊर्जा पॅनल (ग्रीड प्रणाली) कार्यान्वित करण्यात आले
नागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात सोमवारी पुन्हा एक सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित करण्यात आले. विजेचा वापर कमी करून वातावरणास अनुकूल असे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याची मोहीम मध्य रेल्वेने हाती घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक ठिकाणी सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित करण्यात आले असून त्या माध्यमातून विजेचा वापर टाळण्यासोबतच यावर होणारा खर्च देखील वाचविला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, सोमवारी २४ जुलैला बुटीबोरी रेल्वे स्थानकावर १५ किलो वॅट पावरचे सौर ऊर्जा पॅनल (ग्रीड प्रणाली) कार्यान्वित करण्यात आले. या पॅनलच्या माध्यमातून बुटीबोरी रेल्वे स्टेशन आणि परिसरात लागणारी वीज आणि त्यावर होणारा खर्च कमी झाला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हे केले जात आहे. यातून मध्य रेल्वे आत्मनिर्भतेकडे वाटचाल करीत असल्याचेही मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.