माजी सैनिकाने खडकाळ जमिनीत फुलविले माळरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:00 AM2019-03-05T11:00:55+5:302019-03-05T11:02:50+5:30

विदर्भात शेतकरी आत्महत्येचे विदारक चित्र असताना, काटोल तालुक्यातील खरसोली येथे माजी सैनिकाने खडकाळ जमिनीत माळरान फुलविले आहे.

The soldier blossomed in rocky soil | माजी सैनिकाने खडकाळ जमिनीत फुलविले माळरान

माजी सैनिकाने खडकाळ जमिनीत फुलविले माळरान

Next
ठळक मुद्देदेशसेवेसोबतच मातीशी नाते जपले

सौरभ ढोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देशाच्या रक्षणासाठी सैनिकाचे नाते सीमेसोबत जोडले असते. त्याचबरोबर आपण ज्या मातीतून आलो आहो, तिच्याप्रतिही त्याला निष्ठा असते. विदर्भात शेतकरी आत्महत्येचे विदारक चित्र असताना, काटोल तालुक्यातील खरसोली येथे माजी सैनिकाने खडकाळ जमिनीत माळरान फुलविले आहे. ही अभिनंदनीय कामगिरी रत्नाकर वामनराव ठाकरे या माजी सैनिकाने बजावली आहे.
देशाच्या सेवेकरिता स्व:तच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाच्या दूर राहून सीमेवर अहोरात्र काम करण्याचे धाडस हे एका सैनिकात असते. हा प्रत्येक सैनिकाचा देशाप्रतिचा त्यागच म्हणावा लागेल. परंतु सेनेतून सेवा पूर्ण करून परत आल्यानंतर काय? हा प्रश्न अनेक सैनिकांना पडतो. हाच प्रश्न रत्नाकर यांच्याही पुढे उभा झाला. सेनेत असताना घेतलेल्या अवांतर प्रशिक्षणातील काहीचा वापर त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेली जमीन कसून त्यावर फळबाग फुलवली आहे.
संत्र्याची ६०० रोपटी, मोसंबीची ३०० रोपटी, चिकू, बोर, आवळा, आंबा, पपई, पेरू, डाळिंब, नारळ याची लागवड केली.
त्यांची मायेने देखभाल केली. ही फळबाग बघून प्रत्येकाच्या तोंडून आपसुकच शब्द येतात ‘जय जवान,जय किसान’.
रत्नाकर हे मूळचे खरसोली येथील रहिवासी असून, १९८८ ला सैन्यात भरती झाले. त्यांची पहिली पोस्टिंग श्रीलंका सीमेवर होती. सैन्यातील कार्यकाळात त्यांनी देशाच्या विविध सीमेवर काम केले.
२००६ साली निवृत्तीनंतर त्यांना सैन्यदलातर्फे पाच एकर जमीन मिळाली. जमीन अतिशय खडकाळ व असमतोल असल्याने शेती कारायाची कशी? त्यातच जमिनीची पतही शेतीसाठी योग्य नव्हती. परंतु या जवानाने हार न पत्करता आपल्या सैन्यात मिळालेल्या प्रशिक्षणाची आठवण करीत जवानाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे ध्येय ठरवीत खडकाळ जमिनीत माळरान फुलविण्याचा संकल्प केला.
सर्वप्रथम ओलितासाठी पाण्याची सोय करून जमीन समतोल केली. तलावातील गाळाचा भरणा करून त्यात संत्र्याची ६०० रोपटी, मोसंबीची ३०० रोपटी, चिकू, बोर, आवळा, आंबा, पपई, पेरू, डाळिंब, नारळ इत्यादी तर जागेचा योग्य वापर करून शेताच्या सभोवताल चंदनाची रोपटी लावली आहेत.

सैन्यात असताना मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्तीनंतर सैन्याने मला या शेतात माळरान फुलविण्याचे सामर्थ्य दिले, याचा मला अभिमान आहे.
- रत्नाकर ठाकरे,
माजी सैनिक, खरसोली.

Web Title: The soldier blossomed in rocky soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती