जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या : राज्य राखीव पोलीस दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 09:54 PM2020-05-29T21:54:39+5:302020-05-29T21:57:57+5:30

जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत. राज्याचे गृह मंत्रालय आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी उभे आहे, अशा शब्दात राज्य राखीव दलाच्या सर्व गटांशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भावनिक संवाद साधला.

Soldiers take care of your health: Home Minister's dialogue with State Reserve Police Force | जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या : राज्य राखीव पोलीस दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद

जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या : राज्य राखीव पोलीस दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत. राज्याचे गृह मंत्रालय आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी उभे आहे, अशा शब्दात राज्य राखीव दलाच्या सर्व गटांशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भावनिक संवाद साधला.
यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, पोलीस उपमहानिरीक्षक (मुख्यालय) बी. जी. शेखर, पोलीस उपमहानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र महेश घुर्ये, पोलीस उपमहानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पुणे परिक्षेत्र व १० समादेशक सहभागी होते.
महाराष्ट्रातील कोरोना आजाराचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई शहर, मालेगाव, ठाणे शहर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, नागपूर, नाशिक ग्रामीण, औरंगाबाद या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या एकूण ५९ कंपन्या बंदोबस्तास आहेत. या सर्व जवानांचे मनोबल वाढावे याकरिता गृहमंत्र्यांनी शुक्रवारी हा संवाद साधला.
बंदोबस्तादरम्यान कोरोना आजाराने संसर्गित झालेले सध्या १६५ पोलीस कर्मचारी उपचार घेत आहेत. २१४ पोलीस कर्मचारी पूर्ण बरे झाले आहेत व १६६ पोलीस कर्मचारी नवीन निकषानुसार सोडण्यात आले आहेत. एकूण कोरोनाग्रस्त जवानांच्या ७० टक्के जवान आतापर्यंत बरे झाले आहेत. जे जवान खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा उपचार घेत आहेत त्यांना तातडीने वेलफेअर फंडातून एक लाख रुपये देण्यात येत आहेत.राज्य राखीव पोलीस दलाच्या सर्व केंद्रावर जवानांसाठीऑक्सिमीटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याद्वारे जवानांचे आॅक्सिजन लेव्हलची तपासणी होऊ शकेल. अशी माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

आजारी कर्मचाऱ्यांशीही ऑनलाईन संवाद
गृहमंत्र्यांनी राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या जवानांशी देखील ऑनलाईन संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यांना मिळत असलेले औषध उपचार, तेथील सुविधा याबाबत सविस्तर माहिती घेतली.

Web Title: Soldiers take care of your health: Home Minister's dialogue with State Reserve Police Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.