महिला परिचरांच्या समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:39+5:302021-05-14T04:09:39+5:30
रामटेक : जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत असलेल्या महिला परिचरांच्या विविध समस्या साेडवाव्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे महिला परिचर ...
रामटेक : जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत असलेल्या महिला परिचरांच्या विविध समस्या साेडवाव्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे महिला परिचर महासंघाच्या नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
महिला परिचरांना किमान वेतन लागू करावे, त्यांना गणवेश, ओळखपत्र व अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, पेन्शन योजना लागू करावी, कोविड प्रोत्साहन भत्ता व विमा कवच देण्यात यावे, रिक्त पदावर महिला परिचरांच्या वारसदारांना प्राधान्य द्यावे, परिसर स्वच्छता, आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रातील धुलाई भत्ता द्यावा, कार्यक्षेत्रात फिरता प्रवासी भत्ता व दर महिन्याच्या एक तारखेला मानधन देण्यात यावे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याप्रमाणे भाऊबीज देण्यात यावी, चतुर्थश्रेणी दर्जा मिळावा अथवा सेवेत कायम करावे, आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात केला हाेता.
शिष्टमंडळात महासंघाच्या राज्याच्या अध्यक्षा मंगला मेश्राम, जिल्हाध्यक्ष वंदना गाडगे, मीनाक्षी कापसे, रामटेक तालुका अध्यक्ष माया सहारे, उमरेड तालुका अध्यक्ष सुजाता नागदेवते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व आराेग्य मंत्री यांना पाठविण्यात आल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.