आशासेविकांच्या समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:10+5:302021-06-16T04:12:10+5:30
काेंढाळी : काेराेना संक्रमण काळात स्वत:सह कुटुंबीयांचा जीव धाेक्यात घालून आशासेविका अविरत सेवा प्रदान करीत आहेत;मात्र त्यांना शासनाच्या वतीने ...
काेंढाळी : काेराेना संक्रमण काळात स्वत:सह कुटुंबीयांचा जीव धाेक्यात घालून आशासेविका अविरत सेवा प्रदान करीत आहेत;मात्र त्यांना शासनाच्या वतीने फारसा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या विविध समस्या साेडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आशासेविकांनी काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री वाळके यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आपण काेराेना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळापासून आजवर ग्रामीण भागात सेवा प्रदान करीत आहाेत;मात्र, आपल्याला या जीवघेण्या कामाचा याेग्य माेबदला दिला जात नाही. कर्तव्यावर असताना काही आशासेविकांना काेराेनाची लागण झाली आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. त्यांच्या कुटुंबीयांनाही शासनाने काेणतीही मदत केली नाही. आता पुन्हा ग्रामीण भागातील कर्कराेग रुग्णांचा शाेध घेण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. आपल्या कामाचे स्वरूप लक्षात घेता राज्य शासनाने आपल्या विविध समस्या साेडवून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणीही आशासेविकांनी या निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात संध्या शेंडे, मंजुषा गोंडाणे, मीना शेंदरे, माला चोपडे, वर्षा दुपारे, ज्योती भोंगळे, मीना शेंडे, शालिनी परतेती यांच्यासह अन्य आशासेविकांचा समावेश हाेता.