कामठी शहरातील समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:14+5:302021-03-05T04:08:14+5:30
कामठी : शहरातील विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या समस्या ...
कामठी : शहरातील विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या समस्या तातडीने साेडवाव्या, अशी मागणी युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बाेरकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शहरातील भाजीमंडी, कामगार नगर, मांग मोहल्ला, शुक्रवारी बाजार, विणकर कॉलनी परिसरातील कचरा व घाणीच याेग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने या भागात अस्वच्छता तयार झाली आहे. त्यातून डासांची पैदास वाढत असल्याने नागरिकांना मलेेरिया व तत्सम कीटकजन्य आजार हाेण्याची शक्यता बळावली आहे. शहरातील या भागासह अन्य परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे. डुकरे आजाराच्या संक्रमणास कारणीभूत ठरत असल्याने या समस्या तातडीने साेडविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात कामठी नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा यादव, सेवादलचे राजकुमार गेडाम, सोहेल अंजूम, सिराज भाटी, जिल्हा युवक काँग्रेसचे मोहम्मद सलमान, मोहम्मद सुलतान, इरफान अहमद, एनएसयुआयचे साजिद अन्सारी, दिवाकर राव, फरमान खान, जुबेर शरीफ, आजान खान, जफर शेख, सुलतान शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.