शिक्षकांच्या समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:06 AM2021-01-09T04:06:57+5:302021-01-09T04:06:57+5:30
कुही : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्वाधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या काळात शिक्षकांना विविध समस्या भेडसावत असल्याने त्या ...
कुही : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्वाधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या काळात शिक्षकांना विविध समस्या भेडसावत असल्याने त्या आधी साेडविण्यात याव्या, अशी मागणी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार बाबाराव तीनघसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तहसीलदारांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार उपेश अंबादे यांनी निवेदन स्वीकारले.
या निवडणुका येत्या १५ जानेवारी राेजी हाेत आहेत. या आधीच्या निवडणुकांसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना त्यांच्या कामाचे मानधन अद्यापही देण्यात आले नाही. ते मानधन तातडीने राेखीने देण्यात यावे. सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. प्रत्येक मतदान कक्ष सॅनिटाईझ करून नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जेवण, पिण्याचे पाणी व इतर साहित्य व साेयीची व्यवस्था करावी. मतदान केंद्राचे साहित्य घेताना व ते नेताना कर्मचाऱ्यांना त्रास हाेताे. प्रसंगी कर्मचाऱ्यांना त्रास दिला जाताे. त्यामुळे या कामाचे याेग्य नियाेजन करण्यात यावे. निवडणूक कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी पगारी सुटी देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला. या समस्यांवर तहसीलदार बाबाराव तीनघसे यांनी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शासनाकडून रक्कम प्राप्त हाेताच शिक्षकांना त्यांचे मानधन दिले जाईल. साेबतच त्यांच्या इतर समस्या साेडविण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.