वाडीतील वाहतूक समस्या साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:09 AM2020-12-24T04:09:47+5:302020-12-24T04:09:47+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : वडधामणा, एमआयडीसी तसेच वाडी परिसरातील वाहतूक विभागाच्या विविध समस्यांबाबत पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार ...

Solve traffic problems in the village | वाडीतील वाहतूक समस्या साेडवा

वाडीतील वाहतूक समस्या साेडवा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : वडधामणा, एमआयडीसी तसेच वाडी परिसरातील वाहतूक विभागाच्या विविध समस्यांबाबत पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार यांच्या कार्यालयात वाडी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची नुकतीच बैठक पार पडली. यापूर्वी वाडी, वडधामणा परिसरातील वाहतूक समस्येबाबत ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व लोकप्रतिनिधींसोबत पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. त्यावर उपाय म्हणून पाेलीस आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

बैठकीत ट्रान्सपोर्ट परिसरात अवैध दारूविक्री होत असून, दारू पिऊन वाहन चालविणे ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी तसेच ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना व्यवसाय करीत असताना ट्रकचालकांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वडधामणा परिसरात पाेलीस चाैकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच एमआयडीसीमध्ये प्रशासनाने प्रवेश बंद पार्किंगची समस्या व्यवस्थेबाबत चर्चा केली असता, पोलीस आयुक्तांनी सर्व समस्या निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) सारंग आव्हाड, पाेलीस उपायुक्त नरूल हसन, एमआयडीसी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक, वाडीचे ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी, ट्रान्सपोर्ट युनियनचे पदाधिकारी के. सी. शर्मा, महेंद्र शर्मा, सुशील शर्मा, राकेश अग्रवाल, मोहन ठाकरे, केशव बांदरे, टिंकू सिंह, नरेंद्र मिश्रा, फैजान खान, स्वामी प्रसाद सूद, मनोज सिंग आदी उपस्थित होते.

Web Title: Solve traffic problems in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.