कुही स्वातंत्र्यदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:01+5:302021-08-18T04:12:01+5:30
कुही : विविध शैक्षणिक संस्था व कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात संस्थेचे सचिव घनश्याम ...
कुही : विविध शैक्षणिक संस्था व कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात संस्थेचे सचिव घनश्याम धवड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. साेबतच महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे देवचंद जेठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात दिवंगत पत्रकार तथा शिक्षक भालचंद्र गांगलवार स्मृती पुरस्काराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य गजानन मांडेकर, प्रभारी मुख्याध्यापक जगदीश राठोड, डॉ. प्रवीण नागमोते व शिक्षक उपस्थित होते. ऋख्खडाश्रम विद्यालय, सर्वोदय विद्यालय, नूतन विद्यालय, नगर पंचायत, पंचायत समिती, दिवाणी व फौजदारी न्यायालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी ठिकाणी प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कऱ्हांडला येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच यशवंता काकडे, उपसरपंच पूजा भशारकर, मुख्याध्यापिका वसुंधरा किटुकले, शिक्षिका अनामिका जांभुळकर, अनिता उरकुडे, नरेंद्र सलामे, खुशाल भांडे, अनिल कुमरे, ग्रा.पं. सदस्य आकाश भशारकर, स्वप्निल मुंडे, मंदा भांडे, मयुरी काकडे, पूनम भुडे, शंकर मुंडे, राकेश ठाकरे, ग्रामसेवक अनिल लिंगायत आदी उपस्थित हाेते.
...
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान
कन्हान : येथील हिराबाई उच्च प्राथमिक शाळा व वसतिगृह येथे नरेंद्र वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी लीला खुरगे, वसतिगृह अधीक्षक गणेश रामापुरे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना रामापुरे यांनी केले. संचालन चांदेवार यांनी तर आभार माेहनकार यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते.
....
बालाजी पाटील हायस्कूल वग
मांढळ : वग येथील बालाजी पाटील हायस्कूल येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रामचंद्र तितरमारे यांनी ध्वजाराेहण केले. दहावीत शाळेतून प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल प्रतीक देवराव खवास या विद्यार्थ्याचा बिसन पाटील व तुकाराम थूल स्मृतिप्रीत्यर्थ मुख्याध्यापक सज्जन पाटील यांच्यातर्फे राेख बक्षीस व चषक देऊन गाैरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. शाळेच्या आवारात वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सज्जन पाटील, चंद्रकांत दडमल, यशवंत चव्हाण, जितेंद्र निनावे, मधुकर पराते, बादल देशमुख, विद्यार्थी व नागरिक उपस्थित हाेते. मांढळ ग्रामपंचायत येथे सरपंच शाहू कुलसंगे यांनी ध्वजाराेहण केले. वग येथे सरपंच सुनिता निंबर्ते, पारडी येथे सरपंच देवांगणा रंगारी, वीरखंडी ग्रामपंचायत येथे सरपंच रेणुका पडाेळे यांनी ध्वजाराेहण केले.
....
ग्रामपंचायत बाजारगाव
बाजारगाव : ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सरपंच तुषार चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य बालकदास चौरे, कुसुम व्यवहारे, सुरेश कोल्हे, राहुल गुजरकर, छाया बाजनघाटे, बघेले व गावातील नागरिक उपस्थित होते.